आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

85 कोटींच्या प्रॉपर्टीची मालकीण आहे एकता कपूर, 4.5 कोटींचे फक्त कारचे आहे कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्हीची ड्रामा क्वीन एकता कपूर ४३ वर्षाची झाली आहे. 7 जून 1975 रोजी मुंबईत जन्मलेली एकता कपूर बालाजी टेलिफिल्मची जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे. एकताने सास-बहू सिरीअल्समधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या प्रोडक्सनखाली बनलेल्या 'हम पांच', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं किसी रोज' या मालिकांनी खूप लोकप्रियता कमविली.  finapp वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, एकताकडे 13 मिलीयन डॉलर इतकी संपत्ती आहे. 

 

एकताकडे आहे 4 ब्रँडसच्या लग्झरी कार..
एकताकडे ४ ब्रँडसच्या लक्झरी कार आहेत त्यात मर्सडीज बेंज, ऑडी, बीएमडब्ल्यू आणि फोर्ड यांचा समावेश आहे. 


6.5 कोटींचे आहे लक्झरी घर...

एकता कपूर तिच्या पॅरेंट्ससोबत जुहू येथील कृष्णा बंगल्यात राहते ज्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे. तिने 2012 साली मुंबईत लक्झरी घराची खरेदी केली आहे ज्याची किंमत 6.5 कोटी इतकी आहे. याशिवाय एकताचे 43 कोटींची गुंतवणुकही आहे. 

 

अंधेरीमध्ये आहे एकताचे बालाजी टेलिफिल्मस...
- जुहू येथे एकता कपूरचे बालाजी टेलीफिल्म्सचे ऑफिस आहे. ऑफिसच्या एंट्रीवेळीच गणपतीचे मंदीर आहे.
- पायऱ्यांवर चढताच तिथे तिरुपती बालाजीचा फोटो लागलेला आहे. 
-ऑफिसमध्ये एकता कपूरचे एक खास कॅबिन आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, एकता कपूरचे कार कलेक्शन कसे आहे...

बातम्या आणखी आहेत...