आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: \'पिंकी बुवा\'च्या वैवाहिक आयुष्यात आले होते वादळ, नवरा आहे प्रसिद्ध TV अभिनेता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री उपासना सिंह हिचा आज (29 जून) वाढदिवस असून तिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. तीन दशकांहून अधिकचा काळ अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या उपासनाला खरी ओळख मिळाली ती कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमुळे. यामध्ये तिने साकारलेले पिंकी बुआचे पात्र खूप गाजले. 22 वर्षांच्या पिंकीचे पात्र उपासनाने अतिशय छान रंगवले.

 

पाच वर्षांपासून नव-यापासून वेगळी राहात होती उपासना...

उपासनाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास, गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात उपसना आणि तिचे पती नीरज घटस्फोट घेणार असल्याची बातमी आली होती. मात्र नंतर हे प्रकरण शांत झाले होते. वैवाहिक आयुष्यात पुन्हा एकदा एकत्र येण्याचा विचार करत असल्याचे तिच्या पतीने म्हटले होते. उपासना तब्बल पाच वर्षे नव-यापासून वेगळी राहात होती.

 

वैवाहिक आयुष्यात आलेले वादळ अखेर शमले... 

आता मात्र दोघांच्या आयुष्यात आलेले वादळ शमले असल्याचे समजते. उपासना पुन्हा तिच्या पतीकडे नांदायला गेली आहे.दोघांनी 2016 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. परंतू दोघांनी वाद मिटवून घेतला. दिर्घकाळपासून दोघांचे बोलणे पसंत होते. आता दोघांनी प्रकरण मिटवून घेतले आहे.एकत्र आल्यानंतर उपासना पती नीरजसोबत नुकतीच गंगटोकमध्ये व्हॅकेशनसाठी गेली होती.नीरज भादव्दाजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, एकमेकांना स्पेस देताना आमच्यातील दूरावा वाढला होता. बाहेरच्या काही लोकांनी आमच्यातील तणाव वाढवला होता. पण आता सगळं सुरळित झालं आहे. 

 

टीव्ही अभिनेता आहे पती...

उपासना सिंहचे लग्न टीव्ही अभिनेता नीरज भारद्वाजसोबत झाले होते. 2009 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. 'दिल-ए-नादान' या मालिकेत काम करत असताना दोघांचे सूत जुळले होते. 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील चिराग मोदीच्या भूमिकेसाठी नीरजला ओळखले जाते. 

 

वयाच्या 40व्या वर्षी साकारले होते 22 वर्षांच्या 'पिंकी बुआ'चे पात्र...

दोन वर्षांपूर्वी 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये उपासनाने 22 वर्षांच्या 'पिंकी बुआ'चे पात्र साकारले होते. उपासना प्रत्यक्षात तेव्हा 40 वर्षांची होती. तिचा जन्म 29 जून 1975 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. 1986 पासून ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपासना सिंहच्या खासगी आयुष्याशी निगडीत खास गोष्टी... 

 

बातम्या आणखी आहेत...