आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPSC नापास झाल्याने गेला होता डिप्रेशनमध्ये, अशी आहे TV च्या रामदेव बाबाची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अजय देवगण लवकरच बाबा रामदेव यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती करणार आहे. पण हा बायोपिक सिनेमाच्या माध्यमातून नाही तर मालिकेच्या माध्यमातून लोकांना पाहता येणार आहे. रामदेव यांची भूमिका कोण साकारणार यासाठी गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर या भूमिकेसाठी अभिनेता क्रांती झाची निवड झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'मिथिला मखान' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणारा क्रांती प्रकाश झा या मालिकेत बाबा रामदेवची भूमिका वठवणार आहे.

 

या सीरिजमध्ये दोन टप्प्यांत रामदेव यांचे जीवन दाखवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील म्हणजेच बालपणातील रामदेव यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार नमन जैन साकारणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील भूमिका अभिनेता क्रांती प्रकाश झा साकारणार आहे. क्रांतीने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या मित्राची भूमिका साकारली होती. या मालिकेत बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक घटना दाखवल्या जाणार आहेत.

 

अलीकडेच आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने या मालिकेतील त्याच्या निवडीसोबत खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर केल्या आहेत.

 

Q. बालपणापासून अभिनयाची आवड होती का ? 
A. नाही, येथे मी योगायोगाने आलो. खरंतर, मी प्रशासकीय सेवेची तयारी करत होतो मात्र तीन ते चार नंबराने मागे राहिलो. तेव्हा खूप नाराज झालो होतो. डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मुंबईच्या काही मित्रांनी येथे बोलावून घेतले. मुंबई इतके आवडले की परत जाण्याची इच्छा झाली नाही. दिल्लीत कॉलेजमध्ये नाटकात भाग घ्यायचो. तेव्हा अभिनयाचा विचार केला होता. 

 

पुढे वाचा, कशी झाली क्रांतीची या मालिकेसाठी निवड आणि बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...