आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद, राहुल किंवा मोहन भावगत यांना विचारा, 'मुल्क'मध्ये कुणीच लावले नाही पैसे, अनुभव सिन्हाचे ट्विट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: डायरेक्टर अनुभव सिन्हाने सोमवारी ट्विटरवर ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. त्याचा आगामी चित्रपट 'मुल्क'चा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले. काही यूजर्स म्हणत होते की, या चित्रपटासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे पैसे लागले आहे. यावर उत्तर देताना अनुभवने एक ओपन लेटर लिहिले. या लेटरमध्ये त्याने स्पष्ट लिहिले की, "या चित्रपटातवर दाऊदचा पैसा लागला नाही, राहुल गांधीचा नाही आणि आरएसएसचाही पैसा लागलेला नाही. तुम्ही त्यांना विचारु शकता."


- ट्रोलर्सला उत्तर देत तो म्हणाला की, त्याच्या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पैसा लागेलेला नाही. क्रॉग्रेस किंवा राष्ट्रीय स्वयं सेवक संघ किंवा हिंदू वा मुस्लिम संघटनेचा पैसाही लागलेला नाही. 
- या चित्रपटावर चित्रपटाच्या प्रचारासाठी मुललमानांची सहानुभूती मिळवण्याचा आरोप केला जात आहे.
- चित्रपटामध्ये एका मुस्लिम कुटूंबावर लावलेल्या देशद्रोहाचा आरोप आणि नंतर समाजात पुन्हा सन्मान मिळवण्याची कथा सांगण्यात आली आहे. 
- अनुभवने पोस्टमधून सडेतोड उत्तर देत लिहिले की, "'मुल्क'मध्ये दाऊद इब्राहिमचा पैसा लागलेला नाही, तुम्ही त्यांना विचारु शकता. एवढेच नाही तर काँग्रेसचाही पैसा लागलेला नाही तुम्ही राहुल(गांधी)ला विचारु शकता. तुम्ही मोहन भागवतजी यांनाही विचारु शकता. या चित्रपटात श्रीमान दीपक मुकुट आणि त्यांचे वडील कमल मुकट यांचा पैसा लागला आहे. ते या व्यवसायाचे दिग्गज आहेत."
- अनुभवने लिहिले की, 'मुल्क' एक चांगला चित्रपट आहे. याचा हिंदू किंवा मुस्लिम यांच्यासोबत संबध नाही.

 

कधी रिलीज होणार चित्रपट
- 'मुल्क' हा चित्रपट 3 ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
- या चित्रपटात ऋषी कपूर, तापसी पन्नू, प्रती बब्बर, आशुतोष राणा आणि रजत कपूरसारखे स्टार्स आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...