आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः टीव्ही अभिनेता अभिनेता गौतम रोडे अलीकडेच त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड पंखुडी अवस्थीसोबत लग्नगाठीत अडकला. 6 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या अलवार येथील तिजारा फोर्ट पॅलेसमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांच्या लग्नविधी पार पडल्या. या क्यूट कपलच्या लग्नाचे काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. गौतम व्हाइट आणि गोल्ड कलरच्या शेरवानीत शोभून दिसतोय. तर पंखुडी रेड कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसतेय.
लग्नापूर्वी झाली एंगेज्मेंट, कॉकटेल पार्टी, मेंदी आणि संगीत सेरेमनी...
अलीकडेच गौतम आणि पंखुडी यांची एंगेज्मेंट पार्टी, कॉकटेल नाईट आणि मेहंदी सेरेमनी पार पडली. लग्नापूर्वीच्या या विधींसाठी गौतम आणि पंखुरीने पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिले होते. गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये नववधूच्या रुपात पंखुरीचं सौंदर्य आणखीनच खुलून आले होते, तर गौतमही निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये शोभून दिसत होता. तर एन्गेजमेंट पार्टीसाठी गाऊन आणि सूट अशा वेशभूषेमध्ये हे कपल सर्वांची मनं जिंकून गेले. संगीत सेरेमनीत या कपने एश्ले रीबेलो यांनी डिझाइन केलेले ड्रेस परिधान केले. एश्ले यांनीच 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील 'दिल दिया गल्ला' या गाण्यातील सलमान खान आणि कतरिना कैफ यांचे ड्रेस डिझाइन केले होते.
अशी झाली होती गौतम आणि पंखुरी यांची भेट..
‘सूर्यपूत्र कर्ण’ या मालिकेच्या सेटवर गौतम आणि पंखुरीची ओळख झाली. कालांतराने त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बराच काळ त्यांनी हे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. पंखुरी यापूर्वी ‘स्टार’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘क्या कसूर है अमला का?’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
14 वर्षांनी मोठा आहे गौतम..
या दोघांच्या वयात तब्बल 14 वर्षांचे अंतर आहे. गौतम 40 वर्षांचा तर पंखुरी केवळ 26 वर्षांची आहे. वयातील एवढ्या फरकामुळे सुरुवातीला पंखुरीचे आईवडील या लग्नासाठी तयार नव्हते. पण नंतर मात्र त्यांनी लग्नाला होकार दिला.
पुढील स्लाईड्सवर बघा, गौतम आणि पंखुरी यांच्या लग्नाचे Inside Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.