आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइमलाइटपासून दूर आहे या \'C.I.D.\' स्टार्सची फॅमिली, 20 वर्षांपासून सुरु आहे शो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'C.I.D.' ही टीव्ही मालिका गेल्या 20 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 1998 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेला यावर्षी 27 जानेवारी रोजी 20 वर्षे पूर्ण झाली. यामुळे या मालिकेच्या नावाची नोंद  लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. "कुछ तो गडबड है दया" आणि 'दया दरवाजा तोड डो' हे ACP प्रद्युमनचे गाजलेले संवाद लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी आहेत. या मालिकेत काम करणारा कलाकार आता प्रत्येक घरातील अविभाज्य भाग बनला आहे. पण या नावाजलेल्या कलाकारांचे कुटुंबीय मात्र पडद्यामागेच राहे पसंत करतात. त्यामुळे या कलाकारांच्या कुटुंबीयांविषयी सर्वसामान्यांना फारसे काही ठाऊक नाही. आज या पॅकेजमधून आम्ही वाचकांना CID च्या स्टार्सच्या रिअल लाइफ फॅमिलीची माहित देत आहोत.


1. आदित्य श्रीवास्तव
शोमध्ये सीनियर इन्स्पेक्टर आणि रफ अँड टफ लूक असलेल्या अभिजीतची भूमिका वठवणारे अभिनेते आदित्य श्रीवास्तव यांनी 'सत्या', 'पांच', आणि 'गुलाल' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आदित्य यांच्या पत्नीचे नाव मानसी श्रीवास्तव आहे. या दाम्पत्याला आरुषी आणि अद्विका या दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुळचे अलाहबादचा असलेले अभिजीत त्याच्या कुटुंबीयांसोबत आता मुंबईला वास्तव्याला आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, CID स्टार्सच्या रिअल लाइफ फॅमिलीविषयी... 

बातम्या आणखी आहेत...