आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेत गावांकर ठरला \'डान्स इंडिया डान्स\'चा विजेता, सलमानला कोरियोग्राफ करण्याचे आहे स्वप्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कर्नाटकचा संकेत गावांकर 'डान्स इंडिया डान्स सीजन 6'चा विजेता ठरला आहे. त्याने डान्स इंडिया डान्स सीजन 6 मध्ये नैनिका, अनासुरु, शिवम पाठक आणि पीयूषला मात दिली. संकेतने या शोसाठी मुंबईमधून ऑडिशन दिली होती. 

 

सलमान खानला कोरिग्राफ करण्याचे आहे स्वप्न
संकेतला बक्षिस स्वरुपात 5 लाखांची रोख रक्कम मिळाली. आमच्या वेबसाइटने संकेतशी खास बातचित केली. यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की, त्याचा फ्यूचर प्लान आहे आहे. यावर तो म्हणाला की, "मला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोरियोग्राफर म्हणून नाव मोठे करायचे आहे. सलमान खान यांना कोरियोग्राफ करायचे स्वप्न आहे."

 

सुनील ग्रोवरने केले मनोरंजन

डान्स इंडिया डान्सच्या फिनालेमध्ये कॉमेडिअन सुनील ग्रोवरने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'डीआयडी'च्या या सीजनमध्ये मुदस्सर खान, मर्जी पेस्टोनी आणि मिनी प्रदान हे परिक्षक होते. तर जेष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवती महा-परिक्षक होते. संकेतने आपल्या परफॉर्मेंसने प्रेक्षकांसोबतच परिक्षकांचीही मनं जिंकली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाहा कुठे शिक्षण घेतोय संकेत....


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...