आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तारक मेहता...\' मध्ये परतणार दया भाभी, यामुळे शोमधून घेतला होता ब्रेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागिल काही महिन्यांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दया भाभी म्हणजेच दिशा वकानी दिसत नव्हती. परंतू आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. दया लवकरच शोमध्ये परतणार आहे. मार्चपासून दया भाभी शोमध्ये दिसणार आहे. प्रेग्नेंसीमुळे दिशाने शोमधून ब्रेक घेतला होता. सप्टेंबरमध्ये केली होती लास्ट एपिसोडची शूटिंग...


दिशा वकानी मागच्या तीन महिन्यांपासून शोमध्ये दिसत नव्हती. सप्टेंबरमध्ये तिने शेवटची शूटिंग केली होती. शोमध्ये दया भाभी दिसत नसल्याने असे समजले जात होते की, दया भाभीने शो सोडला. परंतू असे नाही. प्रग्नेंन्सीमुळे दयाने ब्रेक घेतला होता. नोव्हेंबर 2017 मध्ये दिशा वकानीने एका मुलीला जन्म दिला. मार्चपर्यंत दिशाची मुलगी 4 महिन्यांची होईल. आलेल्या वृत्तांनुसार दिशाची फॅमिली तिला पुर्ण सपोर्ट करते. दिशा प्रेग्नेंट होती तेव्हाही शोची शूटिंग करत होती. त्यावेळी तिची सासू पुर्णवेळ तिच्यासोबतच सेटवर राहायची.


चार्टर्ड अकाउंटेटसोबत केले लग्न
- दिशाने 24 नोव्हेंबर 2015 मध्ये मयूर पाडियासोबत लग्न केले होते.
- मयूर अॅक्टिंग वर्ल्डमधून नाही. ते मुंबईमध्ये चार्टर्ड अकाउंटेट आहेत.
9 वर्षांपासून 'तारक मेहता...'ची संबंध
- दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1978 मध्ये अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला होता. परंतू ती भावनगरमध्ये राहायची.
- दिशा शालेय शिक्षण घेत होती तेव्हापासून ती अॅक्टिंग करतेय. तिने गुजरात कॉलेज, अहमदाबादमधून ड्रामेटिक आर्ट्समध्ये ग्रॅज्यूएशन केलेय.
- दिशा 2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये काम करतेय.

 

दिशाने या शोज आणि फिल्ममध्ये केलय काम
- दिशा 'खिचडी' (2004) आणि 'इंस्टेंट खिचडी' (2005) या शोजमध्ये दिसलीय.
- फक्त टीव्ही सिरियल्समध्ये नाही तर दिशा बॉडीवुडच्या  'कमसिन : द अनटच्ड' (1997), 'फूल और आग' (1999), 'देवदास' (2002), 'मंगल पांडे : द राइजिंग' (2005), 'सी कंपनी' (2008) और 'जोधा अकबर' (2008) यांसारख्या फिल्ममध्ये दिसली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशा वाकाणीचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...