आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच मुलीसोबत दिसली 'दयाभाभी', गुजरातच्या प्रसिद्ध मंदिरात पती-लेकीसोबत घेतले दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दयाभाभीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दिशा वाकाणी गेल्यावर्षी 28 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीची आई झाली. मुलीच्या जन्माच्या दोन महिन्यांनी म्हणजे जानेवारी महिन्यात दिशा तिच्या माहेरी अहमदाबाद येथे आली होती. येथे तिने मुली आणि पतीसोबत जामनगरच्या नागेश्वर मंदिरात देवीचे दर्शन घेतले. 28 जानेवारी रोजी दिशाची मुलगी दोन महिन्यांची झाली. यावेळी पहिल्यांदाच दिशाच्या लाडक्या लेकीचे फोटोज मीडियात आले. 


ग्रीन साडीत दिसली साध्या लूकमध्ये.. 
यावेळी दिशा ग्रीन कलरच्या साडीत अतिशय साध्या रुपात दिसली. प्रेग्नेंसीनंतर तिचे वजनही वाढलेले दिसले. दिशाने 28 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबईतील पवई येथील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. दिशाची नॉर्मल डिलिव्हरी झाल्याची माहिती तिचे वडील भीम वाकानी यांनी दिली होती.  


2015 मध्ये झाले दिशाचे लग्न...
- 24 नोव्हेंबर 2015 रोजी दिशाने मुंबई बेस्ड चार्टर्ड अकाऊंटंट मयूर पांड्यासोबत लग्न केले.
- दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1978 रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. पण ती लहानाची मोठी भावनगरमध्ये झाली.
- शालेय जीवनापासूनच तिला अभिनयात रुची आहे. गुजरात कॉलेज, अहमदाबाद येथून तिने ड्रामॅटिक आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.
- दिशा 2008 पासून 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेत काम करत आहे.
- याशिवाय ती 'खिचडी' (2004) आणि 'इंस्टंट खिचडी' (2005 ) या शोमध्येही झळकली. 
- टीव्ही मालिकांव्यतिरिक्त दिशाने बॉलिवूडमध्ये 'कमसिन : द अनटच्ड' (1997), 'फूल और आग' (1999), 'देवदास' (2002), 'मंगल पांडे : द राइजिंग' (2005), 'सी कंपनी' (2008) आणि 'जोधा अकबर' (2008) या सिनेमांमध्ये काम केले.


पुढील स्लाईड्सवर बघा, दिशा वाकाणीच्या मुलीची पहिली झलक आणि इतर संबंधित फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...