आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सिमर\'ने लावली पतीच्या नावाची मेंदी, लग्नानंतर साजरी करतेय पहिली ईद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड सासरचे लोक आणि नवरा शोएब इब्राहिमसोबत ईद साजरी करत आहे. लग्नानंतरची ही तिची पहिली ईद आहे. यासाठी तिने फुल तयारी केली. काही व्हिडिओज समोर आले आहे यामध्ये ती एका फॅनकडून मेंदी लावून घेताना दिसतेय. तर ईदसाठी स्पेशल ड्रेल शरारा पसंत करताना दिसतेय. तिने फिस्टिव्हलसाठी बॉटल ग्रीन कलर अँड गोल्डन वर्कचा शरारा पसंत केला आहे. यासोबतच तिने मेंदीमध्ये पती शोएबचे नाव लिहिले आहे. ईदच्या निमित्ताने दीपिका कुटूंबासाठी अचारी मटन, दाल बाटी, पनीर मखनी बनवणार आहे.

 

लग्नापुर्वीही ठेवला होता रोजा
- दीपिकाने सांगितले की, रोजा ठेवणे तिच्यासाठी अवघड नाही, कारण तिने लग्नापुर्वीही रोजा ठेवला आहे.
- तिने सांगितले की, अजून ईदच्या दिवशीचा मेनू ठरलेला नाही. पण ती नव-याच्या आवडीचा अचारी मटन, दाल बाटी आणि मखनी अवश्य बनवणार आहे.
- लग्नानंतरच्या लाइफविषयी बोलातना दीपिकाने सांगितले की, आयुष्य खुप चांगले सुरु आहे. तिने जसा विचार केला होता तसेच तिला मिळाले आहे. ती सासू आणि नंदेच्या खुप जवळ आहे. शोएबसाठी जेवण बनवायला तिला खुप आवडते. 
- तिने सांगितले की, शोएबसोबत लग्न करण्याच्या निर्णयावर घरचे खुप आनंदी होते.

 

'ससुराल सिमर का' शोमधून मिळाली ओळख
दीपिका कक्कडने 'नीर बहे तेरे नैना देवी' या मालिकेतून अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. परंतू तिला 'ससुराल सिमर का' मधून ओळख मिळाली. तिने 'बेइंतहा', 'शास्त्री सिस्टर्स', 'स्वांगिनी', 'बालिका वधू', 'कोई लौट के आया है', 'सजन रे फिर झूठ मत बोलो' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा तिचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...