आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर मुस्लिम बनलेल्या अभिनेत्रीने ठेवला रोजा, आता करतेय ईदची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड नवरा शोएबसोबत ईद साजरी करण्याची तयारी करतेय. दीपिकाची लग्नानंतरची पहिलीच ईद आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की, कुटूंबासोबत ती उत्साहात ईद साजरी करणार आहे. दीपिकाने सांगितले की, ती या दिवशी हिरव्या रंगाचा शरारा घालणार आणि मेंदीही लावणार आहे. दीपिकाने या वर्षी शोएबसोबत लग्न केले होते. शोएबसोबत लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्विकारला होता. ती आता रोजाही ठेवतेय.


लग्नापुर्वीही ठेवला होता रोजा
- दीपिकाने सांगितले की, रोजा ठेवणे तिच्यासाठी अवघड नाही, कारण तिने लग्नापुर्वीही रोजा ठेवला आहे.
- तिने सांगितले की, अजून ईदच्या दिवशीचा मेनू ठरलेला नाही. पण ती नव-याच्या आवडीचा अचारी मटन, दाल बाटी आणि मखनी अवश्य बनवणार आहे.
- लग्नानंतरच्या लाइफविषयी बोलातना दीपिकाने सांगितले की, आयुष्य खुप चांगले सुरु आहे. तिने जसा विचार केला होता तसेच तिला मिळाले आहे. ती सासू आणि नंदेच्या खुप जवळ आहे. शोएबसाठी जेवण बनवायला तिला खुप आवडते. 
- तिने सांगितले की, शोएबसोबत लग्न करण्याच्या निर्णयावर घरचे खुप आनंदी होते.


'ससुराल सिमर का' शोमधून मिळाली ओळख
दीपिका कक्कडने 'नीर बहे तेरे नैना देवी' या मालिकेतून अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. परंतू तिला 'ससुराल सिमर का' मधून ओळख मिळाली. तिने 'बेइंतहा', 'शास्त्री सिस्टर्स', 'स्वांगिनी', 'बालिका वधू', 'कोई लौट के आया है', 'सजन रे फिर झूठ मत बोलो' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...