आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिमर' च्या रिसेप्शनमध्ये भांगात कुंकूभरुन दिसली भारती, हे सेलेब्सही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ससुराल सिमर का' मालिकेतील सिमर अर्थातच दीपिका कक्कडने पुर्ण धार्मिक पध्दतींनी बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत 22 फेब्रुवारीला लग्न केले. या कपलने इंडस्ट्रीमधील मित्रांना नुकतेच रिसेप्शन दिले. यावेळी दीपिका गोल्डन अँड व्हाइट कलरच्या रॉयल लहेंग्यामध्ये दिसली. तर शोएब रेड अँड गोल्डन शेरवानीमध्ये दिसला. दोघंही या रिसेप्शनमध्ये खुप आनंदी दिसत होते. शोएब यावेळी ढोल वाजवताना दिसला. 


रिसेप्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्स 
- दीपिका-शोएबच्या रिसेप्शनमध्ये कॉमेडिअरन भारती सिंह पति हर्ष लिम्बचियासोबत पोहोचली. विशेष म्हणजे भारती स्काय ब्लू कलरच्या गाउनमध्ये पोहोचली. यावेळी तिने हातात चुडा घातला होता आणि भांगेत कुंकू भरले होते.
- भारती यावेळी गाण्यावर ठेका धरताना दिसली. तर 'कुबूल है' ची अभिनेत्री सुरभि ज्योति पिंक अँड गोल्डन रंगाच्या गाउनमध्ये खुप सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये ती खुप ग्लॅमरस दिसत होती.
- या कपलच्या रिसेप्शनमध्ये गुरमीत चौधरी, देबीना बॅनर्जी, शरद केळकर, कीर्ति गायकवाड, सनाया ईरानी, जयति भाटिया, ज्योत्सना चंडोला, रतन राजपूतसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले.

दीपिका-शोएबने केले डेस्टिनेशन वेडिंग
- दीपिका-शोएबने लखनऊपासून 100 किलो मीटर अंतरावरील मौदाहा येथे लग्न केले.
- शोएबचे कुटूंब भोपाळमध्ये राहते. परंतू उत्तरप्रदेशात त्यांचे पुर्वज राहत असल्यामुळे त्यांनी येथे लग्न केले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिका आणि शोएबच्या रिसेप्शनचे काही PHOTOS...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...