आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या घरात गेले आहे दिव्यांका त्रिपाठीचे बालपण, बघा भोपाळच्या घराचे Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ: ये हे मोहब्बतें या मालिकेत इशिता भल्लाची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ येथे तिचा जन्म झाला. दिव्यांकाच्या वडिलांचे भोपाळमध्ये मेडिकल स्टोअर आहे. तिच्या कुटुंबात आईवडील, एक बहीण आणि एक भाऊ आहे. दिव्यांकाचे 8 जुलै 2016 रोजी टीव्ही अभिनेता विवेक दाहियासोबत लग्न झाले. 


भोपाळच्या घरी झाल्या होत्या दिव्यांकाच्या लग्नविधी.. 
दिव्यांका आणि विवेक दाहियाचे लग्न भोपाळमधील प्रसिद्ध कान्हा फन सिटी  येथे झाले होते. तर भोपाळच्या घरी दिव्यांकाच्या लग्नापूर्वीच्या विधी पार पडल्या होत्या. लग्नाच्या निमित्ताने दिव्यांकाच्या आईने घरी खास सजावट केली होती, ती सजावट त्यांनी आजही तशीच ठेवली आहे.

 

अशा जपल्या आठवणी..
- भोपाळच्या चुना भट्टीमध्ये दिव्यांकाचे घर आहे. याचठिकाणी तिच्या लग्नापूर्वीचे विधी झाले होते. 
- ज्याठिकाणी दिव्यांकाला हळद आणि मेंदी लावण्यात आली होती त्या ठिकाणी करण्यात आलेली सजावट आजही तशीच ठेवण्यात आली आहे. 
- दिव्यांकाच्या लग्नाच्या वेळी तिचे घर आदिवासी थीमवर सजवण्यात आले होते. 
- आजही त्याथीमनुसार तयार केलेल्या काही बाबी दिव्यांकाचे वडील नरेंद्र आणि आई नीलम त्रिपाठी यांनी जपल्या आहेत.


'इंडियाज बेस्ट सिनेस्टार'पासून सुरु झाले दिव्यांकाचे करिअर 
- 2004 मध्ये झी टीव्ही वाहिनीवरील 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार' या कार्यक्रमाद्वारे दिव्यांकाने आपल्या करिअरची सुरुवात केली.
- या टॅलेंट शोमध्ये भाग घेण्यासाठी ती भोपाळहून दिल्लीत आली होती. येथे सूपर मॉडेल्सना बघून तिचा आत्मविश्वास डगमळला होता. मात्र तरीदेखील ती या टॅलेंट शोमध्ये सहभागी झाली. 
- येथे तिला मिस ब्युटीफूल स्किनचा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर तिने मिस भोपाळचा किताब आपल्या नावी केला.
- ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिला मुंबईतील कॉल येणे सुरु झाले. 
- एकेदिवशी शकुंतलम फिल्म्सकडून तिला ऑडिशनसाठी फोन आला. ऑडिशनच्या आठवड्याभरानंतर तिची निवड झाल्याचे तिला कळवण्यात आले. 
- 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेत तिला लीड रोल मिळाला. 
- सध्या दिव्यांका स्टार प्लसवरील 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत लीड रोल साकारत आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, भोपाळमधील दिव्यांकाच्या घराचे फोटो.. याच घरात तिचे बालपण गेले...

बातम्या आणखी आहेत...