आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वादग्रस्त शोमध्ये 'संध्या बिंदणी' ला व्हायचेय सहभागी, 11 महिन्याच्या मुलाची आहे आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रसिध्द टीव्ही सीरियल 'दीया और बाती हम' मध्ये संध्या बिंदणीची भूमिका साकारणा-या दीपिका सिंहने एका मुलाखतीत नुकतीच आपली इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली की मला बिग बॉस या शोमध्ये सहभागी व्हायचे आहे. इतकेच नाही तर दीपिकाचा नवरा रोहित राज गोयल यालाही दीपिकाला बिग बॉसमध्ये पाहायची इच्छा आहे. 


11 महिन्याच्या मुलाची आई आहे दीपिका...
- दीपिका सिंहने दीया और बाती हम या टीव्ही शोमधून अॅक्टिंगच्या जगतात पाऊल ठेवले.
- 2616 मध्ये हा शो ऑफएयर झाला होता.
- 2016 पासून ती छोट्या पडद्यापासून गायब आहे.
- गेल्यावर्षी मे 2017 मध्ये तिने मुलगा सोहमला जन्म दिला होता.
- सोहम 11 महिन्यांचा आहे. दीपिका सध्या त्याच्या संगोपनात व्यस्त आहे.

 

छोड्या पडद्याला करतेय मिस
दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले की, ती छोट्या पडद्याला मिस करतेय. तिने बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, मला एक लहान मुलगा आहे त्याचे संगोपन करणे माझी प्रायोरिटी आहे. तिला विचारण्यात आले की डान्स रियालिटी शो 'नच बलिए' मध्ये नव-यासोबत सहभागी होणे पसंत करशील का. यावर ती म्हणाली की, 'मला वाटत नाही की, रोहित यामध्ये उत्सूक असेल तो त्याच्या प्रोफेशनमध्ये आनंदी आहे. तो सध्या 'जीजीमां' शो डायरेक्ट करत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा संध्या बिंदणीचे फॅमिली फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...