आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dr.Hathi यांचे मुंबईत दोन ठिकाणी होते रोल्सचे शॉप, खाण्यासोबत खाऊ घालण्याची होती आवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणा-या कवी कुमार आजाद यांचे 9 जुलै रोजी हार्ट अटॅकने निधन झाले. ते गेल्या 9 वर्षांपासून या मालिकेत काम करत होते. मालिकेत ते नेहमी खाण्याच्या गोष्टी करताना दिसत असत. ख-या आयुष्यातही त्यांना खाण्याचा आणि खाऊ घालण्याचा शौक होता. मुंबईमध्ये त्यांचे रोल्सचे शॉप आहे.

 

उघडणार होते रेस्तरॉ
कवी कुमार यांनी एका मुलाखतीत उल्लेख केला होता की, कुसुम रोल्स या नावाने त्यांचे दोन शॉप आहेत. येथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन प्रकारचे रोल्स मिळतात. या दुकानात 30 प्रकारचे रोल्स मिळतात. एवढेच नाही तर ते ज्यावेळी शॉपवर असत तेव्हा तेथे येणारे कस्टमर्स त्यांच्यासोबत सेल्फी घेत असता. ते लवकरच एक रेस्तरॉ सुरु करण्याची प्लानिंग करत होते.

सेटवर सोबतच्या कलाकारांसोबतही खाण्याच्या गोष्टी करत होते


शोमध्ये भिडेची भूमिका साकारणा-या मंदारनुसार - "आम्ही एकत्र बसायचो, जेवण करायचो. एवढेच काय तर आम्ही जेव्हा शूटवर जायचो तेव्हा ते मला विचारायचे की, आज टिफिनमध्ये काय आणले आहे. आपल्या टीव्हीतील भूमिकेप्रमाणेच त्यांना ख-या आयुष्यातही खाण्याचा शौक होता."


लिहायला आवडायचे
या मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की, अनेक लोकांना त्यांचे खरे नावही माहिती नव्हते. लोकांच्या नजरेत त्यांची ओळख डॉ. हाथी म्हणून आहे. लो त्यांची भूमिका लक्षात ठेवतात याचा त्यांना आनंद होतो. कवी कुमार हे त्यांच्या नावा प्रमाणे लिहायचे. त्यांना लहानपणापासून कवीता लिहिण्याची आवड होती.

 

सर्जरीने कमी केले होते वजन
ऐकेकाळी कवी कुमार यांचे वजन 254 किलो झाले होते. यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. 2010 मध्ये सर्जरी करुन त्यांनी 80 किलो वजन कमी केले होते.

बातम्या आणखी आहेत...