आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • सलमान खान, दस का दम, Dus Ka Dum Promo Fame Yogita Bihani To Star In Ekta Kapoor Show

सलमान खानच्या एका Kiss ने बदलले या मॉडेलचे नशीब, घडले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'दस का दम\'च्या नवीन प्रोमोत सलमान खानसोबत योगिता. - Divya Marathi
\'दस का दम\'च्या नवीन प्रोमोत सलमान खानसोबत योगिता.

मुंबईः नशीब कधी कसे पालटेल, याचा नेम नसतो.  असेच काहीसे घडले आहे, अभिनय क्षेत्रात दीर्घ काळापासून संघर्ष करत असलेल्या मॉडेल योगिता बिहानीसोबत. झाले असे, की  'दस का दम' या सलमान खानच्या आगामी शोच्या प्रोमोमध्ये योगिता सलमानसोबत झळकली आहे. प्रोमोमध्ये सलमान योगिताला विचारताना दिसतोय, की किती टक्के भारतीय मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर करतात. योगिता या प्रश्नाचे उत्तर देते आणि योग्य उत्तर दिल्याने सलमान तिला चेक देऊन तिच्या गालावर किस करतो. विशेष म्हणजे सलमानच्या या एका किसमुळे योगिताचे जणू नशीबच पालटले आहे. तिला एकता कपूरची नवीन मालिका 'दिल ही तो है'ची ऑफर मिळाली आहे. ही मालिका करण जोहरच्या गाजलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटावर आधारित आहे. इतकेच नाही तर तिने अलीकडेच दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन यांच्यासोबत एक अॅडही शूट केली आहे. 


योगिता म्हणाली, 'मी सातव्या आसमानवर..'
योगिताने एका मुलाखतीत सांगितले, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात लकी महिना ठरला. मी दीर्घ काळापासून अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. पण मला यश मिळत नव्हते. पण आज मी सातव्या आसमानवर आहे.' ती पुढे म्हणाली, 'सलमानसोबत काम करणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला. आता मला एकता कपूरच्या मालिकेतही लीड रोल मिळाला आहे. आता मी टॉलिवूडचे सुपरस्टार नागार्जुनसोबत काम करुन सातव्या आसमानवर पोहोचले आहे. 'दस का दम'चा प्रोमो शूट झाल्यापासून मला अनेक प्रॉडक्ट्सच्या जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी विचारणा झाली आहे.'


पुढील स्लाईडवर बघा, दस का दम प्रोमोचे फोटोज..  

 

बातम्या आणखी आहेत...