आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • EXCLUSIVE: Comedian Siddharth Sagar Famously Known As Selfie Mausi Is Missing Since 4 Months. A Friend Suspects His Mother Has Kidnapped Him!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'सेल्फी मौसी\' फेम कॉमेडिअन सिद्धार्थ चार महिन्यांपासून बेपत्ता, आईनेच अपहरण केल्याची शंका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ सागर - Divya Marathi
सिद्धार्थ सागर

'सेल्फी मौसी' या नावाने प्रसिद्ध असलेला स्टँडअप कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या एका मैत्रिणीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. ‘सेल्फी मौसी अर्थात सिद्धार्थ सागर तुम्हाला आठवतोय का? गेल्या चार महिन्यांपासून तो बेपत्ता असून 18 नोव्हेंबर 2017 रोजी त्याला अखेरचं पाहिलं होतं. तो कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही. तो माझा खूप चांगला मित्र असून त्याला शोधण्यासाठी माझी मदत करा,’ असे तिने या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले. त्यासोबतच सिद्धार्थचे काही फोटोदेखील तिने पोस्ट केले आहेत.
टेलिव्हिजनवरील बऱ्याच कॉमेडी शोमध्ये झळकलेल्या सिद्धार्थने कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी यांच्यासोबत स्टेज शेअर केला आहे. ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाफ्टर के फटके’, ‘कॉमेडी सर्कस के अजुबे’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. ‘द कपिल शर्मा शो’मध्येही सिद्धार्थ झळकला होता. 


आईनेच अपहरण केल्याची वर्तवली जातेय शंका... 
सिद्धार्थच्या एका जवळच्या मित्राने सिद्धार्थच्या आईवर शंका उपस्थित केली आहे. सिद्धार्थच्या आईनेच त्याचे अपहरण केल्याची शंका त्याच्या मित्राने वर्तवली आहे. सिद्धार्थच्या एका मित्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधींना धक्कादायक माहिती दिली आहे. सिद्धार्थच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि त्याच्या आईचे एकमेकांसोबतचे नाते चांगले नव्हते. त्याच्या आईचा स्वभाव हेकेखोर आहे. ती केवळ सिद्धार्थचा पैशांसाठी वापर करुन घेते. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थच्या आईने त्याला मारहाण केली होती. त्यावेळी सिद्धार्थ त्याच्या मित्रांना म्हणाला होता, की जर माझे काही बरेवाईट झाले, किंवा मी बेपत्ता झालो, तर यासाठी माझी आईच जबाबदार असेल. 

 

पुढे वाचा, विभक्त झाले आहेत सिद्धार्थचे आईवडील..

मित्रांनी केला सिद्धार्थच्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न...

सिद्धार्थच्या मित्रांना मिळत आहे धमकी... 

इव्हेंट मॅनेजर करत आहेत सिद्धार्थशी संपर्क साधण्याचा प्रयत्न...  यासह बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...