आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​निकाहनंतर समोर आला \'सिमर\'चा फर्स्ट लूक, बघा लग्नाचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ससुराल सिमर का' या मालिकेतील सिमर अर्थातच अभिनेत्री दीपिका कक्कड बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. लखनऊपासून 100 किलो मीटरस्थित मौदाहा याठिकाणी दोघांचा निकाह झाला. निकाहनंतर दोघांचे नवीन फोटोज समोर आले आहेत. - शोएबने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन लिहिले,  'Do Dil mil gaye 💕💓💞💗'.

- आणखी एका फोटोला त्याने कॅप्शन दिले, '#kalachashma bahuti cool lagta hai'. 

- एका फोटोसोबत त्याने लिहिले, 'Aakhir Do Dil mil gaye #dodilmilgaye #shoaikakishaadi'.

 

असा होता लग्नात दीपिकाचा लूक...
शेअर केलेल्या फोटोत दीपिका अतिशय सुंदर दिसतेय. लग्नात तिने पिंक आणि गोल्डन कलरचा शरारा घातला होता. लग्नासाठी दीपिकाने इस्लाम धर्माचा स्वीकार करुन स्वतःचे नाव फैजा असे ठेवले.

 

26 फेब्रुवारी रोजी होणार रिसेप्शन...
- या नवविवाहित दाम्पत्याने त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन 26 फेब्रुवारी रोजी मुंबईतील जुहू स्थित प्रिन्सेस हॉटेलमध्ये ठेवले आहे.
- रिसेप्शनमध्ये दीपिकाने 'ससुराल सिमर का' या मालिकेच्या संपूर्ण कास्टला आमंत्रित केले आहे.
- याशिवाय दीपिकाचे क्लोज फ्रेंड्स काजोल श्रीवास्तव, फलक नाज, ज्योत्सा चंडोला रिसेप्शनला उपस्थिती लावणार आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, दीपिका आणि शोएब यांच्या लग्नाचा अल्बम...  

बातम्या आणखी आहेत...