आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 11: हितेनची गळाभेट घेऊन परतली पत्नी गौरी प्रधान, अर्शीला म्हणाली असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी गौरी प्रधान घरात आल्यानंतर हितेन भावूक झाला होता. - Divya Marathi
पत्नी गौरी प्रधान घरात आल्यानंतर हितेन भावूक झाला होता.

मुंबई - बिग बॉस-11 मध्ये सध्या सर्व कंटेस्टंट्स त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. नुकतेच अर्शी खान, शिल्पा शिंदे, विकास गुप्ता, प्रियंक शर्मा आणि पुनीश शर्मा यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबिय आले होते. तर, हितेन तेजवाणीला भेटण्यासाठी त्याची पत्नी गौरी प्रधान आली होती. 

भेटीवेळी इमोशनल झाले दोघे.. 


- बिग बॉसच्या 10व्या आठवड्यात गौरी प्रधानने घरात प्रवेश केला, तेव्हा सर्व कंटेस्टंट्सला स्टॅच्यू केले जाते. सर्व कंटेस्टंटला भेटत जेव्हा गौरी प्रधान हितेनजवळ येते तेव्हा ती अश्रूंना वाट मोकळी करुन देते. 
- गौरी अतिशय भावूक होऊन म्हणते की मला वाटले होते मी रडणार नाही, मात्र तुमच्यापासून एवढे दूर राहू शकत नाही... तुम्ही फार छान खेळत आहात, लव्ह यू..! 
- यावेळी हितेनही इमोशनल होतो आणि त्याच्या डोळ्यातही अश्रू असतात. 
- तेव्हाच बिग बॉसचा आदेश येतो, गौरी घरातून बाहेर ये, आणि ती निघून जाते. तेव्हाच हितेन तिच्यामागे धावत जातो आणि म्हणतो, तुला हग करायचे आहे. 
- विशेष म्हणजे, हितेन सोडून गौरी प्रधानने प्रत्येकाशी संवाद साधला. पुनीशी गळाभेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या. 
- शिल्पा शिंदेला गौरी म्हणाली तु घरातली सर्वात यंगेस्ट मॉम आहेस. त्यासोबतच हितेनला साथ दिल्याबद्दल विकास गुप्ताला गौरीने धन्यवाद दिले. 
- त्यानंतर अर्शीची मजा घेताना गौरी म्हणाली, 'मला हितेनसोबतची तुझी थट्टा-मस्करी आवडते, त्याने मला काही फरक पडत नाही.'

 

हिनाची घेतली क्लास... 
- गौरी जेव्हा हिना खानजवळ पोहोचते तेव्हा म्हणते, 'मला वाटतं की ते (हितेन) फार चांगले खेळत आहेत. मी जो मेसेज पाठवला होता, की बी अ लीडर नॉट अ फॉलोअर... तो फक्त हितेनसाठी होता, दुसऱ्यांसाठी नाही.'

झाले असे होते, की कॅप्टन्सी टास्क दरम्यान हिनाने हितेनवर बरेच तोंडसूख घेतले होते. त्यामुळे तिचीवर फार टीका देखील झाली होती. 
- शेवटी गौरी प्रधान, आकाश ददलानीची भेट घेऊन त्याला म्हणते की, 'मला तुझा खेळ खूप आवडत होता, मात्र तू मला निराश केले.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हितेन-गौरीच्या भेटीचा व्हिडिओ आणि प्रत्येक क्षणाचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...