आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमधून बाहेर येऊन हिना म्हणाली - संस्कारी बहूची इमेज तोडण्यासाठी केले असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसच्या घराबाहेर येताच हिना खानने आपल्या वर्तनाविषयी माफी मागितली. रविवारी मीडियासोबत बोलताना हिना म्हणाली की, 'कोणाला माझ्या वर्तनामुळे त्रास झाला असेल तर माफ करा. कोणाला दुखावण्याचे माझे इंटेंशन नव्हते.' रविवारीच या शोचा ग्रँड फिनाले झाला. सर्व अफवांना मोडित काढत शिल्पा शिंदे या शोची विनर ठरली.


संस्कारी बहूची इमेज मोडण्यासाठी केले एग्रेसिव्ह बिहेवियर
- हिनाने वेबसाइटला बोलताना सांगितले की, मी माझ्या फॅन्ससाठी बिग बॉसमध्ये आले होते. लोकांमध्ये माझी संस्कारी बहूची इमेज होती. ती मला मोडायची होती. मी वेळ आल्यावर बोलू शकते, हे मी यामध्ये दाखवून दिले. मी एक स्ट्राँग मुलगी आहे. माझ्या आजुबाजूला काही चुकीचे घडले तर मला सहन होत नाही. मी बोलून देते, यामुळेच काही लोकांना दुःखही झाले असेल.
- तर शिल्पा शिंदे म्हणाली की, बिग बॉसने मला खुप काही दिलेय. माझे आयुष्य बदललेय. कलर्ससोबत शिल्पाचे तीन शोसाठी एग्रीमेंटही साइन झालेय. लवकर शोचे नाव डिक्लेयर होतील.

 

हिनाच्या फॅन्सला जोरदार झटका
यावेळचे बिग बॉस खुप चर्चेत होते. यामध्ये हिना खान आणि शिल्पा फायनलमध्ये होत्या. शिल्पा आणि हिनामध्ये शोच्या सुरुवातीपासूनच भांडण होत होती. महाराष्ट्रातील शिल्पा 'भाभीजी घर पर है' मधून प्रसिध्द झालीय. नंतर तिला शोमधून काढून टाकण्यात आले. परंतू ज्यावेळी सलमान खानने विनरचे नाव घोषित केले तेव्हा हिनाच्या फँन्सला जोरदार झटका मिळाला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिना खानचे ग्लँमरस फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...