आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVची संस्कारी सून हिना खानने घातली बिकिनी, लोक म्हणाले - अर्शीला शिकवलेले शहाणपण विसरलीस का!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 'ये रिश्ता क्या कहलाता है' या गाजलेल्या टीव्ही मालिकेत संस्कारी सून अक्षराची भूमिका वठवणारी अभिनेत्री हिना खान सध्या गोव्यात हॉलिडे एन्जॉय करतेय. तिने सोशल मीडियावर तिचे व्हेकेशनचे फोटोज शेअर केले आहे. यामध्ये हिना बिकिनीत दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिल्यांदाच हिना पब्लिकली बिनिकीत दिसतेय. पण सोशल मीडिया यूजर्सना तिचा हा अंदाज पसंत पडला नाही. या फोटोवरुन लोक तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने तर हिनाला तिच्या त्या वक्तव्याची आठवण करुन दिली, जे तिने बिग बॉसच्या (सीझन 11) घरात अर्शी खानला सुनावले होते. यूजरने हिनाच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले, "येथे कपडे फाडून अर्शीला तुला बाहेर काम मिळणार नाही... हिना खान तुझे हे वक्तव्य जरा आठव. "


 'बिग बॉस'मध्ये प्रियंकने घातली होती बिकिनी... 
- हिनाने जी बिकिनी व्हेकेशनमध्ये घातली आहे. तीच बिकिनी बिग बॉसच्या घरात तिचा को-कंटेस्टंट प्रियंक शर्माने एका स्पेशल टास्कच्या वेळी घातली होती. हिनाला या बिकिनीत बघून अनेक सोशल मीडिया यूजर्सने लिहिले, "हिना तू तर म्हणाली होती, की तू इतरांचे कपडे घालत नाही.. मग हे काय आहे.."  'बिग बॉस 11' (2017-18) मध्ये हिना इतर कंटेस्टंटसोबतच्या तिच्या वागणुकीमुळे वादात राहिली होती. विशेषतः जेव्हा तिने अर्शी खानला तुला कपडे फाडून बाहेर काम मिळणार नाही, असे म्हटले होते, त्यावर सलमान खानने हिनाची चांगलीच शाळा घेतली होती.  चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या वक्तव्याची निंदा केली होती.  'बिग बॉस'नंतर हिना अद्याप छोट्या पडद्यावर दिसली नाही. 


पुढील स्लाईड्सवर बघा, हिनाचे गोवा व्हेकेशनचे फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...