आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना खानने शेअर केला योग करताना फोटो, पुन्हा एकदा करावा लागला टिकेचा सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हिना खानने इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने तिचा योग करतानाचा फोटो शेअर केला होता. यावर तिला लोकांनी ट्रोल करणे सुरु केले आहे. हिनाने यासोबत एक कॅप्शन लिहिले होते - "जेव्हा आपण आपला श्वास घेतो तेव्हा आपली शांतता कुणीही घेऊ शकत नाही. योगा आपल्याला जगातील सर्वात चांगली एनर्जी देते." यानंतर लोकांनी हिनाला ट्रोल केले. ते म्हणाले की, हा पब्लिसिटी स्टंट आहे आणि तिला ट्रोल करणे सुरु केले.


एका यूजरने लिहिले - नमाज पठन कर, हे फक्त फोटो आणि पब्लिसिटी स्टंट आहे. तर एका यूजरने लिहिले की, यापुर्वी कधीच योगा करतानाचा फोटो शेअर केला नाही. तर एका यूजरने लिहिले - तुम्ही मुसलमान आहात, हे सर्व तुम्ही करायला नको. मुसलमानांसाठी नमाज हा सर्वात चांगला योगा आहे. 

 

काही यूजरने हिनाला केला सपोर्ट
हिना खानचा बचाव करत एका फॅनने लिहिले - मला माहिती आहे की, ट्रोलर्स तुला ट्रोल करुन निगेटिव्हिटी पसरवत आहेत. परंतू तुम्ही या लूजर्ससमोर हारुन जाऊ नका. तुम्ही टीव्हीवर परत या आणि आपल्या कामाने त्यांना सडेतोड उत्तर द्या. तुमच्या येणा-या आयुष्यासाठी ऑल द बेस्ट.


रमजानच्या दरम्यानही ट्रोल झाली हिना...
यापुर्वी रमजानच्या वेळी हिनाला ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा तिने ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील डान्सिंग व्हिडिओ शेअर केला होता. यामुळे एका यूजरने कमेंट करुन लिहिले होते की, कमीत कमी रमजानकडे तर लक्ष दे. तर एका यूजरने लिहिले होते की, थोडी तरी लाज बाळग, रमजान सुरु आहे... रोजे ठेवू शकत नाही तर कमीत कमी रोजांची रिस्पेक्ट कर.

बातम्या आणखी आहेत...