आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाबीजी घर पर हैं'मध्ये नेहमी होत असते यांची चर्चा, पण अद्याप दिसल्या नाहीत या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2 मार्च 2015 रोजी अँड टीव्हीवर सुरु झालेल्या या मालिकने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवली. पण गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेत अनेक गोष्टींचा अद्याप उलगडा झालेला नाही. म्हणजेच अनेक पात्रांचा या मालिकेत उल्लेख केला जातो. पण हे पात्र अद्याप प्रेक्षकांनी या मालिकेत बघितलेच नाहीत. उदाहरणार्थ मालिकेत अनेकदा दरोगा हप्पू सिंह त्याची प्रेग्नेंट पत्नी आणि नऊ मुलांचा उल्लेख करत असतो. पण अद्याप त्याची पत्नी आणि नऊ मुलांना मालिकेत कुणीच बघितले नाही.

 

अगदी याचप्रमाणे पंडित रामफल आणि विभूती नारायण मिश्राचे वडील आहूती नारायण मिश्रा यांचा नावाचा उल्लेखदेखील अनेकदा होत असतो. पण हे पात्र अद्याप शोमध्ये दिसलेच नाहीत. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेतील अशाच गोष्टींविषयी सांगतोय, ज्यांचा उल्लेख तर नेहमी होतो, पण ते प्रेक्षकांना कधीच दिसत नाहीत.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत या गोष्टी...   

बातम्या आणखी आहेत...