आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV :'रुप मर्द का नया स्वरुप'मध्ये दिसणार बालिका वधुचा 'जग्या'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: कलर्स टीव्हीवर सुरु होत असलेल्या 'रुप मर्द का नया स्वरुप'चा रुप मोठा होईल. या शोमध्ये 12 वर्षांचा लीप घेतला जाईल. यामध्ये तरुण रुपची भूमिका बालिका वधुमधून प्रसिध्द झालेला जग्या म्हणजेच शशांक व्यास साकारेल. समाजात सुरु असलेल्या पुरुष वर्चस्वाच्या मान्यतांवर प्रश्न विचारणा-या तरुणाची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. शोमध्ये त्याचे वडील शमशेर त्याला आपल्या प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतू रुप एक सॉफ्ट मनाचा व्यक्ती आहे. त्याचे विचार आपल्या वडिलांसारखे नाही.

 

विचार बदलेल नवीन रुप
शोमध्ये रुप म्हणजेच शशांक 12 वर्षांनंतर कथेमध्ये नवीन वळण घेऊन येणार आहे. येथे जुन्या मान्यतांनुसार सुरु असलेली मनुष्याची परिभाषा नवीन पध्दतीने सुरु करेल. शशांकने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी नेहमीपासूनच काही तरी वेगळ्या असलेल्या स्पेशल भूमिका निवडतो.
- शशांकने सांगितले की, 'रुप-मर्द का नया स्वरुप' शोची कॉन्सेप्ट बोल्ड आहे. जी रुढी परंपरांना ठेच पोहोचवते. परिवर्तन आणण्यासाठी जेंडर स्टीरियोटाइपविषयी बोलण्याची गरज आहे. मला ही संधी रश्मी शर्मा टेलीफिल्म्सने दिली आहे.


डोनाल बिस्ट बनणार रुपची लव्हर
शोमध्ये रुपच्या अपोजिट डोनल बिस्ट आहे. ती इशिकाची भूमिका साकारत आहेत. रुप इशिकावर प्रेम करतो. शोमध्ये काम करण्याविषयी डोनल म्हणाली की - मी खुप उत्साहित आहे. मला या शोमध्ये जेंडर स्टीरियोटाइपसारख्या मुद्दयावर काम करण्याची संधी मिळत आहे.


सोशल मीडियावर चर्चेत
शशांक व्यास गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यू लूकमुळे चर्चेत आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटोज पोस्ट केले आहे. हे पाहून सोशल मीडियावर फॅन्स त्याला रणबीर कपूरचा लुक-अकाइक म्हटले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...