आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्ट्रेस जूही परमारचा घटस्फोट, पोटगी न घेता एकटी उचलणार मुलीची जबाबदारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः टीव्ही अभिनेत्री जूही परमारने  तिचा नवरा सचिन श्रॉफपासून घटस्फोट घेतला आहे. या दोघांनी याचवर्षी सामंजस्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, जूहीने पती सचिनपासून घटस्फोटानंतर पोटगी मागितलेली नाही. मुलगी समायराची कस्टडी जूहीला मिळाली असून ती एकटीने तिची जबाबदारी उचलणार आहे. तर सचिनला अधूनमधून मुलीला भेटण्याची परवानगी कोर्टाकडून मिळाली आहे. जूही आणि सचिन गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहात होते. 

 

काय आहे जूही-सचिनच्या घटस्फोटाचे कारण....  
- जूही आणि सचिन यांचे 2009 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि नात्यात दुरावा येऊ लागला. 
- दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा दीर्घकाळापासून सुरु होती. 2011 मध्ये या कपलमध्ये भांडण झाल्याचे वृत्त मीडियात आले होते. पण मुलगी समायराच्या जन्मानंतर सर्वकाही ठिक झाले होते. पण नंतर पुन्हा त्यांच्यात वाद निर्माण झाले.
- सचिनच्या मते, जूही रागिट स्वभावाची असून तो तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आहे. जूहीच्या अशा स्वभावामुळे त्यांच्यात भांडणे व्हायला लागली होती.
- तर जूहीच्या मते, सचिन गोष्टी लवकर विसरतो आणि हेच त्यांच्या भांडणाचे मूळ कारण आहे.
- जूहीने काही दिवसांपूर्वी 'जज्बात' या चॅट शोमध्ये सांगितले होते, "सचिनने तिच्याकडे प्रेमाची कबुली दिली होती आणि त्यामुळे तिने घाईघाईत त्याच्यासोबत लग्न केले होते. प्रत्यक्षात लग्नाच्यावेळी ती पूर्णपणे यासाठी तयार नव्हती. लग्नापूर्वी मीही सचिनच्या प्रेमात पडेल होते, पण लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचले नव्हते. त्याच्या दबावात मला लग्न करावे लागले होते."
- लग्नाच्या काही वर्षांतच भांडणे सुरु झाली होती. आमच्यात सर्वकाही सुरळीत आहे, हे मला पटत नव्हते. त्यामुळे वेगळे होण्यापलीकडे आमच्याकडे पर्याय नव्हता, असे जूही म्हणाली होती.  


अशी झाली होती दोघांची पहिली भेट...
- जूही आणि सचिनची पहिली भेट मुळीच रोमँटिक नव्हती. एका शोसाठी दोघे पहिल्यांदा भेटले होते. 
- त्यावेळी दोघांनी पहिल्यांदा त्यांचा नंबर एक्सचेंज केला होता. तो शो मात्र काही कारणास्तव ऑन एअर जाऊ शकला नाही. 
- त्यानंतर दोघांमध्ये थोडे बोलणे सुरु झाले होते. त्याकाळात जूहीचा  'सास वर्सेस बहू' हा शो सुरु होणार होता.
- एकेदिवशी सचिनने अचानक जूहीला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले. जूहीसुद्धा त्याला भेटायला गेली. भेटल्यानंतर सचिनने जूहीला लग्नाची मागणी घातली. सचिन अशाप्रकारे प्रपोज करेल, असा विचारदेखील जूहीने केला नव्हता. 


जयपूरमध्ये झाले होती रॉयल वेडिंग... 
- 2009 मध्ये जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचे लग्न झाले होते. दोघांनी लग्नाचा दिवस अतिशय खास बनवला होता.
- दोघांचे रॉयल वेडिंग झआले होते. त्यांचे लग्न आजदेखील जयपूरच्या टॉप 50 लग्नांपैकी एक मानले जाते. 

बातम्या आणखी आहेत...