आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लग्न थाटतोय हा TV अभिनेता, बघा मेंदी-संगीतचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेतून लाइमलाइटमध्ये आलेला अभिनेता गौतम रोडेने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात गर्लफ्रेंड पंखुरी अवस्थीसोबत साखरपुडा करुन चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. आता काही तासांतच हे दोघे जन्माचे जोडीदार होणार आहेत. दोघांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. नुकतीच पंखुरीच्या हातावर गौतमच्या नावाची मेंदी रचली. अलवर, राजस्थान येथे या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. अलीकडेच त्यांची एंगेज्मेंट पार्टी, कॉकटेल नाईट आणि मेहंदी सेरेमनी पार पडली. या कार्यक्रमांचे फोटोज समोर आले आहेत. 

 

लग्नापूर्वीच्या या विधींसाठी गौतम आणि पंखुरीने पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिले असून ते दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये नववधूच्या रुपात पंखुरीचं सौंदर्य आणखीनच खुलून आले होते, तर गौतमही निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये शोभून दिसत होता. तर एन्गेजमेंट पार्टीसाठी गाऊन आणि सूट अशा वेशभूषेमध्ये हे कपल सर्वांची मनं जिंकून गेले. संगीत सेरेमनीत या कपने एश्ले रीबेलो यांनी डिझाइन केलेले ड्रेस परिधान केले. एश्ले यांनीच 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील 'दिल दिया गल्ला' या गाण्यातील सलमान खान आणि कतरिना कैफ यांचे ड्रेस डिझाइन केले होते. 

 

‘सूर्यपूत्र कर्ण’ या मालिकेच्या सेटवर गौतम आणि पंखुरीची ओळख झाली. कालांतराने त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बराच काळ त्यांनी हे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. पंखुरी यापूर्वी ‘स्टार’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘क्या कसूर है अमला का?’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 

या दोघांच्या वयात तब्बल 14 वर्षांचे अंतर आहे. गौतम 40 वर्षांचा तर पंखुरी केवळ 26 वर्षांची आहे. वयातील एवढ्या फरकामुळे सुरुवातीला पंखुरीचे आईवडील या लग्नासाठी तयार नव्हते. पण नंतर मात्र त्यांनी लग्नाला होकार दिला.


पुढील स्लाईड्सवर बघा, गौतम आणि पंखुरी यांच्या संगीत, मेंदी, एंगेज्मेंट पार्टीचे खास Photos...

बातम्या आणखी आहेत...