आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4BHK च्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते कपिल शर्माची 'बुआ', अशी आहे तिची संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आता ती एक यशस्वी अभिनेत्री आणि कॉमेडियन आहे. ती मुंबईमध्ये आलिशान  4BHK प्लॅटमध्ये राहते. 10 वर्षांपुर्वी उपासनाने आईचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लोखंडवालाच्या एका पॉश एरियामध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता. यासाठी तिने तिचा बंगला विकला होता. 

 

घरात एकटीच राहते उपासना...
- काही काळापुर्वी divyamarathi.com ने उपासनाच्या घराला भेट दिली. आता ती या घरात एकटीच राहते.
- उपासनाने सांगितले की, "हे घर खरेदी करण्यापुर्वी मी अंधेरीच्या मेन एरियापासून थोडाशा दूर एका बंगल्यात राहत होते. तेव्हा माझी आई माझ्यासोबत जॉगर्स पार्कमध्ये यायची तेव्हा ती या बिल्डिंगकडे एकटक बघत राहायची."
- "तिला हा परिसर खुप आवडायचा. येथील पॉझिटिव्हिटीमुळे असे झाले असेल. कधीकधी तर ती मला न सांगताच दिवसातून 5-6 वेळा इकडे येत होती. ज्यावेळी ही गोष्ट मला कळाली, मी येथे घर घेण्याचा निर्णय घेतला."

 

अभिमानास्पद होता फ्लॅट खरेदी करण्याचा क्षण
- उपासना सांगते की, "या आपार्टमेंटची किंमत खुप जास्त होती. परंतू मला माझ्या आईचे स्वप्न पुर्ण करायचे होते. यासाठी मी बंगला विकून हे अपार्टमेंट खरेदी केले. यासोबतच मी एक्स्ट्रा कमाई करणेही सुरु केले. खरं सांगायच झाल तर, मी फ्लॅट खरेदी केला ही माझ्यापेक्षा माझ्या आईसाठी सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट होती. ती आता माझ्यासोबत नाही, परंतू घराच्या प्रत्येक कोप-यातील तिच्या आठवणी ताज्या आहेत."

 

होशियारपुरच्या घरात होत्या फक्त दोन रुम
- उपासना सिंह होशियारपुर, पंजाबमधील राहणारी आहे. तिथे तिचे कुटूंब फक्त 2 रुमच्या घरात राहत होते.
- सध्या उपासना ज्या ठिकाणी राहते, त्या घराच्या आजुबाजूला हिरवळ आहे आणि इतर ठिकाणांसारखी ट्रॅफिकही येथे नाही.
- बिल्डिंगच्या ज्या फ्लोरवर उपासनाचा फ्लॅट आहे, त्याच फ्लोरवर उपासनाची बहिणही राहते. 
- उपासना वास्तु शास्त्रावर विश्वास ठेवते. तिने हॉलच्या एका कोप-यात आपले अवॉर्ड्स ठेवले आहेत. तर दुस-या कोप-यामध्ये एक ओल्ड फोटो फ्रेमसोबत एक स्टायलिश घड्याळ लावले आहे.
- सोफ्यापासून तर वॉल पेंटिंग आणि पडदयापर्यंतची प्रत्येक वस्तू उपासनाने आपल्या स्वतःच्या हाताने सजवली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता उपासनाच्या घराचे Inside Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 


 

बातम्या आणखी आहेत...