आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • कपिल शर्मा, Kapil Sharma Shocking Photo Weight Gain Oh My God... कपिल शर्माला ओळखणे झाले कठीण, पुर्वीपेक्षा जास्त वाढले वजन

Oh my god... कपिल शर्माला ओळखणे झाले कठीण, पुर्वीपेक्षा जास्त वाढले वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदवीर कपिल शर्मा दीर्घ काळानंतर मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसला. त्याचे विमानतळावरचे जे फोटोज समोर आले आहेत, त्यामध्ये क्षणभर हा कपिल शर्माच आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.  त्याचे वजन पुर्वीपेक्षा बरेच वाढले असून डोळ्याखाली काळी वर्तुळं आली आहेत. एका वाहिनीशी बोलताना, गेल्या काही महिन्यांत वजन बरेच वाढल्याचे कपिलने सांगितले. एप्रिल 2018 मध्ये  'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' हा शो बंद झाल्यानंतर कपिल मीडियात दिसला नव्हता. त्याने कामापासून ब्रेक घेतला असून सोशल मीडियापासून देखील तो आता दूर आहे.

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा लवकरच नवीन प्रोजेक्टसोबत कमबॅक करणार आहे. याविषयी त्याने ट्वीट करुन सांगितले, की तो आता त्याच्या लाइफ स्टाइलमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय. फॅन्ससोबत बोलताना तो म्हणआला होता,  'लवकरच जुन्या रुपात परतताच माझे प्रोफाइल पिक्चर बदलेल. सध्या माझ्याविषयी ज्या चर्चा सुरु आहेत, त्याकडे लक्ष न देता, मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कामच माझी प्रेरणा आहे.' 

 

वादात राहिला कपिल शर्मा... 
कपिल शर्मा आणि वाद या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कपिल शर्माला  'द कपिल शर्मा शो'मुळे लोकप्रियता मिळाली. दरम्यान 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाहून परतत असताना विमानात सुनील ग्रोव्हरसोबत कपिलचे कडाक्याचे भांडण झाले. याचा परिणाम म्हणजे सुनीलने कपिलच्या शोमधून काढता पाय घेतला. हे होत नाही तोच, बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींना कपिलच्या शोचे शूटिंग न करताच परतावे लागले. वेळेत शूटिंग पूर्ण करत नसल्याने कपिल अनप्रोफेशनल असल्याचा ठपका त्याच्यावर बसला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला त्याचा द कपिल शर्मा हा शो ऑगस्ट 2017 मध्ये डबाबंद झाला. त्यानंतर कपिल डिप्रेशनमध्ये गेला. याचकाळात त्याला दारुचे व्यसन जडले. त्याला उपचारासाठी रिहॅब सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

 

'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' या शोमधून केले होते कमबॅक...

याचवर्षी मार्च महिन्यात कपिल  शर्मा 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' या शोमधून छोट्या पडद्यावर परतला. मात्र अवघ्या तीन एपिसोडनंतर हा शो बंद पडला. हा शोसुद्धा कपिलच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे चॅनलने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा शो सुरु असतानाच कपिल डिप्रेशनमध्ये गेल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे तो सेटवर शूटिंगसाठी वेळेत हजर राहात नव्हता. कपिलची तथाकथित एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोसने खुलासा केला होता, की कपिलचे मानसिक संतुलन ठिक नसून तो सिजोफ्रेनियाने पीडित असण्याची शक्यता आहे. कपिलने अनेकदा आत्महत्या करणार असल्याचे बोलून दाखवले आहे, असे प्रीती सिमोसने सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...