आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी, वर्षा अखेरपर्यंत टीव्हीवर करणार नाही Comeback

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सुनील ग्रोवरसोबत भांडण केल्यानंतर कपिल शर्मा काहीना काही कारणांमुळे वादात अडकतोय. आता त्याच्यासाठी अजून एक वाईट बातमी आहे. तो कमबॅक करणार असे वृत्त होते. परंतू या सर्व अफवा होत्या. सोर्सेसनुसार, सध्या कपिलच्या कमबॅकची काहीच अपेक्षा नाही. कारण तो या वर्षाच्या अखेरपर्यंत सोनी टीव्हीवर   दिसणार नाही.

 

सोनी टीव्हीवर पहिलेच अनेक रिअॅलिटी शो सुरु आहेत. यामध्ये दस का दम सीजन 3, इंडियन आयडल सीजन 10, कोण बनेगा करोडपती सीजन 10 आणि कॉमेडी सर्कस सारख्या शोजचा समावेश आहे. पुढच्या 6 महिन्यांच्या हिशोबाने या चॅनलने पहिलेच या शोजला स्लॉट दिला आहे. यासोबतच 'सुपर डान्सर' या डान्स शोची प्रसिध्दी पाहता, चॅनल याच्या पुढच्या सीजनची तयारी करत आहे. यामुळे कपिल शर्माच्या शोसाठी स्लॉट नाही. आता त्याला 2019 पर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.


आम्हाला कपिलवर पुर्ण विश्वास
सोनी चॅनलचे बिझनेस हेड दानिश खानने माध्यमांशी बोलताना कपिलविषयी सांगितले की - काही एपिसोड केल्यानंतर कपिल शर्माची तब्येत दुर्दैवाने बिघडली. याच कारणामुळे त्याला ब्रेक घ्यावा लागला. सोनी चॅनलला कपिलच्या कामावर पुर्ण विश्वास आहे. कपिल जेव्हा फिजिकली आणि मेंटली पुर्णपणे फिट होईल. तेव्हा चॅनल त्याच्यासोबत काम करेल.

 

बातम्या आणखी आहेत...