आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राग विसरुन कंगनाने घेतली गळाभेट, करनविषयी केले असे वक्तव्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंगना रनोट काही दिवसांपुर्वीच 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार' या रियलिटी शोच्या स्टेजवर गेली होती. या वेळी शोचे जज करन जौहरसोबत तिची जबरदस्त केमिस्ट्री दिसली. प्रोफेशनल पध्दतीने कंगना आणि करनने गळाभेट घेतली आणि नंतर दोघांचे बोलणे सुरु झाले. या शोमध्ये कंगनाला प्रश्न विचारण्यात आला की, करन जोहर आपल्या पाहुण्यांना या शोमध्ये काय वाढतो? तर कंगनाने थट्टा-मस्करीमध्ये संधीसाधून उत्तर दिले की, "करन आपल्या पाहुण्यांना विष वाढतो." कंगना आणि करनची ही भेट का आहे खास...

 

- मार्च 2017 मध्ये कंगना करनचा शो  'कॉफी विद करन' मध्ये गेली होते. येथे नोपोटिज्म यावरुन दोघांमध्ये खुप वाद झाला होता.
- कंगना या शोमध्ये म्हणाली होती की, जर कधी मी माझी बायोग्राफी लिहिली तर यामध्ये एक चॅप्टर नेपोटिज्मवर असेल. हा करनला डेडिकेट असेल.
- या वादाच्या काळात कंगनाने करनवर आरोप लावले होते की, तो नेपोटिज्मला साथ देतो आणि कंगनाने करणला फिल्मचा माफिया असे देखिल म्हटले होते. परंतू यानंतर दोघांमधील दुरावा वाढला.
- करन एका इंटरव्ह्यूमध्ये कंगनाला संबोधून म्हणाला की, 'कंगनाला  nepotism चा अर्थ माहिती नाही. इंडस्ट्रीमध्ये 13 नवीन डायरेक्टर मीच इंट्रोड्यूस केलेय. ज्यांचे बॉलीवुडशी कोणतेच कनेक्शन नाहीये'
- कंगना आणि करनच्या वादावर खुप चर्चा झाली होती. याच कारणांमुळे  'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार' च्या स्टेजवरील कंगना आणि करनची भेट खास होती. आता हे पाहावे लागेल की, ही भेट फक्त स्टेजपुरती मर्यादित राहते की हे दोघे त्यांचा वाद विसरुन पुन्हा मित्र बनतात...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा  'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार' च्या सेटवरील कंगनाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...