आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBCच्या एका एपिसोडसाठी 3 कोटी घेणार बिग बी, मागीलवेळी 200 कोटींमध्ये झाली होती डील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती' हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहेत. बिग बी यंदा केबीसीचे दहावे पर्व होस्ट करतील. बातम्यांनुसार. या शोसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया जून 2018 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या नवीन पर्वासाठी बिग बींनी त्यांच्या मानधनात वाढ केली आहे.  गेल्या पर्वापेक्षा बिग बींनी यंदा मानधनात वाढ केली आहे.

 

200 कोटींमध्ये झाली होती गेल्या पर्वाची डील... 
अमिताभ बच्चन यांनी KBC-9 साठी चॅनलसोबत 200 कोटींची डील साइन केली होती. गेल्या पर्वात एकुण 75 एपिसोड प्रसारित झाले होते. प्रत्येक एपिसोडसाठी त्यांनी दोन कोटी 60 लाख एवढे मानधन घेतले होता. आता दहाव्या पर्वाच्या प्रत्येक एपिसोडसाठी बिग बी तब्बल तीन कोटी रुपये मानधन घेणार असल्याचे वृत्त आहे. पण यंदा एकुण किती एपिसोड प्रसारित होतील, याविषयी गुप्तता बाळगण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट 2018 पासून  KBC-10 छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, KBC होस्ट करतानाचे अमिताभ बच्चन यांचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...