आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी डिप्रेशनमध्ये होता \'क्योंकी...\' चा मिहिर, या ड्रीम होममध्ये मिळाली पॉझिटिव्ह एनर्जी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या गाजलेल्या मालिकेतील मिहिर वीरानी आठवतोय का? या मालिकेमुळे मिहिर अर्थातच अभिनेता अमर उपाध्याय घराघरांत पोहोचला. करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात मिहिर मुंबईत वन रुम किचनमध्ये राहात होता. पण आज परिस्थिती पालटली आहे. आता मिहिर त्याच्या पत्नीसोबत वर्सोवा येथे फाइव्ह बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. divyamarathi.com सोबत केलेल्या खास बातचितमध्ये अमरने त्याच्या करिअर आणि ड्रीम होमविषयी गप्पा मारल्या.  

 

- अमरने सांगितले,  संघर्षाच्या काळात मी वन रुम किचनमध्ये दिवस काढले. थोडी प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर मी मालाड येथे एक थ्री बीचएके फ्लॅट खरेदी केला होता. या घरात मी चार वर्षे राहिलो. पण या घरात मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. 

 

- मुलाखतीत अमर पुढे म्हणाला, "मुंबईत स्वतःचे घर खरेदी करणे हे एक स्वप्न असते. मी मालाड येथे थ्री बीचएके फ्लॅट खरेदी केला.  पण त्या घरात मला कधीच पॉझिटिव्ही मिळाली नाही. त्याच घरात माझ्या आईचे निधन झाले. माझ्या हातून 'क्योंकी सास...' ही मालिका गेली. अनेक वाईट घटना त्याकाळात माझ्यासोबत घडल्या. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. यामुळे मी ते घर विकले." 

 

आता पत्नीसोबत ड्रीम होममध्ये राहतो अमर.. 

- अमरने त्याच्या ड्रीम होमविषयी सांगितले, "जुन्या घरात काहीच चांगले घडत नसल्याने माझ्या मित्राने मला वास्तूशास्त्रानुसार घर खरेदी करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला मला हे पाच बेडरुम किचन असलेले घर खरेदी करणे माझ्या आवाक्याबाहेर वाटले होते. पण या घरात प्रवेश करताच मला पॉझिटिव्ह एनर्जीची जाणिव झाली. त्यामुळे मी हे घर खरेदी केले. गेल्या 13 वर्षांपासून मी माझ्या पत्नीसोबत येथे वास्तव्याला आहे. हे माझे स्वप्नातील घर आहे.

 

- 'अमरने त्याच्या ड्रीम होमच्या इंटेरिअरविषयी सांगितले. 'माझ्या दोन आर्किटेक्ट मित्रांनी मला घराचे इंटेरिअर डिझाइन करण्यात मदत केली. मला याला मॉर्डन लुक द्यायचा होता. यामध्ये फ्रेंच डोअरपासून अमेरिकन फॉल्स सीलिंग, इंडियन सोफा लावले आहेत. माझ्या बायकोने घर डिझाइन करण्यात खुप मदत केली.'


या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अमर उपाध्यायच्या घराची खास झलक दाखवत आहोत. कसे आहे अमरचे ड्रीम होम बघा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...