आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICU मध्ये अॅडमिट आहे 'नच बलिए' कंटेस्टंट विनोद ठाकुर, गंभीर आहे प्रकृती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नच बलिए सीजन 6 फेम दिव्यांग डान्सर विनोद ठाकूर हॉस्पीटलमध्ये अॅडमिट आहे. विनोद व्हिल चेअऱवर इंडीया गेटपासून गेटवे ऑफ इंडियाचा 1500 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघाला होता. जेव्हा तो 1500 किमीच्या अगदी जवळ पोहोचला होता तेव्हा त्याची तब्येत खराब झाली आणि त्याला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. त्याची स्थिती नाजूक सांगण्यात येत आहे. 

 

विनोद 1500 किमीचा प्रवास करण्यासाठी 18 मार्चला दिल्लीहून निघाला होता. रस्त्याने 40 दिवसांत तो हा प्रवास पूर्ण करणार होता. 30 एप्रिलला हा प्रवास पूर्ण होणार होता तेव्हा त्याची तब्येत खालावली आणि तो चक्कर येऊन पडला. 


- विनोदला मालाडच्या रक्षा नावाच्या हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. त्याला डिहाइड्रेशन, लो बीपी, अनियमित हार्ट बीट असा त्रास होत आहे. 
- विनोद एक डान्सर, स्टंट माइंडर आणि व्हिलचेअर क्रिकेटरही आहे. त्याला 'बिग बॉस'12 साठी विचारणा करण्यात आली होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, विनोद ठाकूरचा फोटो..

बातम्या आणखी आहेत...