आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोच्या वाढदिवशी राम कपूरने केले रोमँटिक डिनर, शोमध्ये पडले होते प्रेमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून प्रसिध्द झालेल्या राम कपूरने पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूरचा 44 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. रामने इंस्टाग्रामवर सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले आहे. यामध्ये दोघंही रेस्तरॉमध्ये बसून डिनर करत वाइनचा ग्लास चीअर्स करताना दिसत आहेत. रामने या फोटोला "Romantic dinner with the birthday girl at the golden dragon Taj" असे कॅप्शन दिले आहे. राम आणि गौतमीने 14 फेब्रुवारी 2003 ला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आहे सिया आणि एक मुलगा अक्स आहे. ऑनस्क्रीन वहिनी बनली होती गौतमी, तेव्हा राम पडला प्रेमात...


- राम कपूर आणि गैतमी गाडगिळची लव्ह स्टोरी 'घर एक मंदिर'(2000-02) च्या सेटवर सुरु झाली होती.
- त्यावेळी गौतमीने मॉडलिंगमध्ये करिअर केले होते आणि राम सीरियल्ससाठी इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न करत होता.
- या मालिकेमध्ये गौतमी, राम याची वहिनी होती. दोघांच्या रोज भेट होत असल्यामुळे चांगली मैत्री झाली.
- नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि लव्ह स्टोरी सुरु झाली. 2003 मध्ये या कपलने लग्न केले. दोघांनी आर्य समाजाच्या पध्दतींनी लग्न केले. त्यावेळी हे कपल दोन रुमच्या घरात राहत होते.
- राम हा पंजाबी कुटूंबातून आहे. तर गौतमी महाराष्ट्रीयन कुटूंबातून आहे. यामुळे दोघांच्या कुटूंबाला हे नाते आवडले नाही.
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, गौतमीचे हे दुसरे नाते आहे. गौतमीने कमर्शिअल फोटोग्राफर मधुर श्रॉफसोबत पहिले लग्न केले होते. परंतू दोघं वेगळे झाले.

बातम्या आणखी आहेत...