आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा झाला 'महाभारत'चा अभिनेता, शेअर केला मुलीचा First Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'महाभारत' या मालिकेत सहदेवाची भूमिका साकारणा-या लावण्य भारव्दाज या अभिनेत्याची बायको डेडे फ्रिसेलियाने मुलीला जन्म दिला आहे. लावण्याने आपल्या मुलीचे नाव प्रतिष्ठा ठेवले आहे. प्रतिष्ठाचा जन्म 25 मे रोजी झाला. परंतू लावण्याने ही बातमी आता इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ही त्याची दूसरी मुलगी आहे. पहिल्या मुलीचे नाव दक्षिणा आहे. लावण्याने मुलीचा फोटो पोस्ट करत लिहिले, 'या जगात तुझे स्वागत आहे बेबी नंबर 2, छोटीशी प्रतिष्ठा' तर एका फोटोमध्ये लावण्यात आपल्या मुलीला हातात घेऊन तिला किस करताना दिसतोय. या फोटोवर त्याने कॅप्शन दिलेय की,  'here is no greater blessing than a baby girl.girls r blessing from heaven'. लावण्या आणि फ्रेसेलियाचे लग्न 2 वर्षांपुर्वी झाले होते. त्याची पत्नी इंडोनेशियाची आहे. दोघं 2015 मध्ये पहिल्यांदा एका इव्हेंटमध्ये भेटले होते.

बातम्या आणखी आहेत...