आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशी दिसायची मंदिरा बेदी, तुम्ही पाहिलेय का तिचे हे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री, मॉडल, फॅशन डिझायनर आणि टीव्ही प्रेंजेटर मंदिरा बेदी 46 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 15 एप्रिल 1972 मध्ये कोलकाता येथे झाला. मंदिराच्या वडीलांचे नाव वीरेंद्र सिंह बेदी आणि आईचे नाव गीता बेदी होते. तिला 90 च्या दशकातील 'शांति'  या मालिकेती प्रमुख भूमिकेसाठी ओळखले जाते. या कौटूंबिक मालिकेत मंदिराने आपल्या हक्कांसाठी लढणा-या मुलीची भूमिका साकारली होती. या शोनंतर मंदिरा घराघरात शांतीच्या नावाने प्रसिध्द झाली. यानंतर मंदिराने 'औरत' आणि 'क्योकि सास भी कभी बहू थी' सारख्या मालिकांमध्ये काम केले.


केले आहे आयपीएल कव्हरेज
- 'शांती' मध्ये ग्लॅमरपासून दूर राहणारी मंदिरा बेदी आज आपली स्टाइल आणि ग्लॅमरससाठी ओळखली जाते. तिने अँकर बनून आयपीएल सीजन-3 चे कव्हरेज केलेय. यावेळी तिने घातलेल्या साड्या खुप प्रसिध्द झाल्या. 2014 मध्ये तिने स्वतःचे साडी स्टोर लान्च केले.


व्हॅलेन्टाइन डेला केले होते लग्न
- मंदिराने व्हॅलेन्टाइन डेला लग्न केले होते. 14 फेब्रुवारी 1999 मध्ये तिने फिल्ममेकर राज कौशलसोबत विवाह केला. दोघांना एक मुलगा आहे. त्याचा जन्म 19 जून 2011 ला झाला. त्याचे नाव वीर आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मंदिरा बेदीचे बालपणापासून आतापर्यंतचे निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...