आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौनी रॉयच्या एक्स बॉयफ्रेंडने केले सिक्रेट मॅरेज, बघा लग्नाचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस-10'चा स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता गौरव चोप्रा वयाच्या 38 व्या वर्षी बोहल्यावर चढला. मुळची दिल्लीची असलेल्या हितिशा चिरिन्द्रासोबत गौरवने गुपचुप लग्न उरकले. हितिशा आणि गौरव गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. नोएडात झालेल्या या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. खरं तर गौरव टीव्ही इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेता आहे, मात्र त्याने त्याच्या लग्नाता सेलिब्रिटींनी आमंत्रित केले नाही.

 

खरं तर टीव्ही इंडस्ट्रीसाठी गौरवचे लग्न अतिशय शॉकिंग आहे. कारण तो अनेक दिवस अभिनेत्री मौनी रॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होता. हे दोघे 'पति-पत्नी और वो' या शोमध्ये एकत्र झळकले होते. गौरवने मौनीला अनेक वर्षे डेट केले, पण लग्नाची गोष्ट निघताच दोघांचे ब्रेकअप झाले. मौनीपूर्वी अभिनेत्री नारायणी शास्त्रीसोबत गौरव रिलेशनशिपमध्ये होते. नारायणीसोबत ब्रेकअप होताच मौनीसोबत त्याचे सूत जुळले होते.

 

19 फेब्रुवारी रोजी गुपचुप केले लग्न...
गौरव आणि हितिशा यांनी 19 फेब्रुवारी रोजी गुपचुप लग्न केले. वर-वधूच्या रुपात गौरव आणि हितिशा अतिशय सुंदर दिसले. हितिशाने लग्नात रेड कलरचा लहेंगा आणि गोल्ड ज्वेलरी घातली होती. तर गौरवने व्हाइट कलरच्या शेरवानीसोबत मरुन रंगाची शॉल घेतली होती. गौरवने अनेक टीव्ही शोजमध्ये अभिनय केला आहे. 'डोली अरमानों की', 'लावण्या', 'पिया का घर', 'कभी हां कभी ना', 'घर की लक्ष्मी बेटियां', 'उतरन', 'ऐसा देस है मेरा'सह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये गौरव झळकला आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, गौरवच्या लग्नाचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...