आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम असल्याने 'या' टीव्ही अभिनेत्याला मिळाले नाही घर, कारमध्ये घालवल्या रात्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही शो 'नामकरण'मधील अभिनेता जैन इमाम लवकरच अभिनेता वरुण सोबतीसोबत राजीव खंडेलवालच्या चॅट शोमध्ये दिसणार आहे. 'जज्बात' नावाचा हा शो 27 मे रोजी ऑनएअर होणार आहे. या शोवर स्पेशल गेस्ट म्हणून पोहोचलेल्या जैन इमामने त्याच्यासोबतच करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याचा स्ट्रगल सांगितला आहे. चॅट   शओ दरम्यान त्याने सांगितले की इंडस्ट्रीत काम मिळवणे त्याच्यासाठी फार अवघड झाले होते. घरमालकानेही त्याला घराबाहेर काढले होते. मुस्लिम असल्याने त्याला इतरत्र कुठे घर मिळणेही मुश्किल झाले होते. 

जैन इमामने सांगितले की, "तो कामाच्या शोधात फिरत असे आणि काही ठिकाणी ऑडिशनही देत होता पण यादरम्यानच त्याला घरमालकाने बाहेर काढले आणि इतर कोणीही त्याला घर देण्यास तयार नव्हते. यावेळी त्याने कित्येक रात्री त्याच्या कारणध्ये घालवल्या."

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, जज्बात या शोदरम्यानचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...