आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमान कोहलीच्या गर्लफ्रेंडने सांगितले मोठे कारण, का मागे घ्यावी लागली तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- नीरु रंधावाने सांगितले, तक्रार का घ्यावी लागली मागे.
- नीरु म्हणाली - पैशांसाठी नाही, बाबांची परिस्थिती पाहून केस मागे घ्यावी लागली.
- नीरुचा खुलासा, काजोलच्या बहिणीलाही मारहाण करत होता सलमान.


मुंबई : काही दिवसांपुर्वी अरमान कोहलीवर त्याच्या गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन पार्टनर नीरु रंधावाने मारहाण करण्याची केस दाखल केली होती. यानंतर अरमानला  अरेस्ट करण्यात आले. परंतू नंतर या प्रकरणाला नाटकी वळण लागले. रिपोर्ट्सनुसार, कोर्ट बाहेर हे प्रकरण मिटवण्यासाठी नीरुला एक कोटी रुपये देण्यात आले. यानंतर शुक्रवारी बॉम्बे हायकोर्टने केस रद्द केली आणि अरमानला जेलमधून सोडले. परंतू नीरु म्हणतेय की, तिने अरमानला पैशांसाठी सोडलेले नाही. 


केस मागे घेण्याचे खरे कारण कोणते?
- एका मुलाखतीत नीरुने केस रद्द करण्याचे खरे कारण सांगितले. तिने सांगितले की, तिने पैशांसाठी सेटलमेंट केलेली नाही. तिने आपल्या वडिलांची परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. नीरु सांगते की, "मी माझ्या 90 वर्षांच्या वडिलांना कोर्टात पाहिले तर मला खुप दुःख झाले. या वयात त्यांनी कोर्टाच्या फे-या माराव्या असे मला वाटत नाही. यामुळे मी पाऊल मागे घेतले. आता मी माझे पुर्ण फोकस करिअरवर करणार आहे. मला फॅशन डिझायनरलच्या रुपात आपली ओळख बनवणार आहे."

 

अरमान तनीशालाही मारायचा
- अरमान कोहलीने काजोलची बहीण तनिषा मुखर्जीलाही डेट केले आहे. 'बिग बॉस 7' मध्ये हे दोघं कंटेस्टंट म्हणून होते. तेव्हा यांच्यात जवळीक वाढली. दोघ एकमेकांना Kiss करतानाही दिसले होते. शोमधून बाहेर पडल्यानंतरही ते एकमेकांसोबत होते. परंतू लवकरच त्यांचे ब्रेकअप झाले. नीरुने याविषयी मोठे व्यक्तव्य दिले. ती म्हणाली की, "अरमानने तनिषालाही मारहाण केली होती. नोकरांनी मला याविषयी सांगितले. दोघांच्या मित्रांनीही मला सांगितले की, अरमान तनिषाला मारहाण करायचा."


मुनमुन दत्ताने मारहाणनंतर केले होते ब्रेकअप
- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिताजी उर्फ मुनमुन दत्ताचे अफेअर अरमानसोबत होते. रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये अरमान आणि मुनमुन एकमेकांच्या जवळ आले आणि त्याचवर्षी वेगळे झाले. असे बोलले जात आहे की, व्हॅलेन्टाइन डेला एका गोष्टीमुळे अरमान आणि मुनमुनचे भांडण झाले होते. यावेळी अरमानने मुनमुनला मारहाण केली होती. मुनमुनने याविषयी अरमानची पोलिसांमध्ये तक्रार केली होती. यामुळे त्याला फाइन भरावा लागला होता.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...