आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVच्या 'किन्नर बहू'चे वेडिंग रिसेप्शन, स्टनिंग लुकमध्ये दिसली, गळ्यात नव्हते मंगळसूत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'किन्नर बहू' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुबीना दिलाइकचे 24 जून रोजी लुधियाना येथे वेडिंग रिसेप्शन झाले. 21 जून रोजी शिमल्यात अभिनेता अभिनव शुक्लासोबत रुबीना विवाहबद्ध झाली. लग्नानंतर अभिनवच्या होमटाऊन लुधियाना येथे त्यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनचे काही निवडक फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये रुबीना स्टनिंग लूकमध्ये दिसतेय. तिने डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला सिल्वर सिमरी गाऊन परिधान केला होता. रुबीनाने तिचा हा लूक हेवी इयररिंग्ससोबत स्टाइल केला होता. तिने भांगात कुंकू भरले होते. पण गळ्यात मंगळसूत्र मात्र घातले नव्हते. अभिनव ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. त्याने रेड कलरचे जॅकेट कॅरी केले होते. ही पार्टी कुटुंबीयांसाठी होती.


- रुबीनाने रिसेप्शनचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करुन तिने त्यांना कॅप्शन दिले,  'Standing in the light of your Halô......📸'. 
- लुधियानानंतर आता 28 जून रोजी मुंबईत रुबीना आणि अभिनव यांचे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन होणार आहे. या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी होतील. 


पुढील स्लाईड्सवर बघा, लुधियाना येथे झालेल्या रिसेप्शन पार्टीचे खास Photos... 

बातम्या आणखी आहेत...