आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमनला डेट करतेय 'पवित्र रिश्ता' ची अभिनेत्री, बॉलिवूड अभिनेत्यासोबत होती लिव्हइनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. अंकिता मुंबई येथील बिझनेमन विक्की जैनला डेट करतेय असे वृत्त आहे. गेल्या वर्षी हे दोघं होळी सेलिब्रेशन पार्टीमध्ये एकत्र पोहोचले होते तेव्हापासून दोघांची जवळीक वाढत आहे. येथे या दोघांचे नाते फ्रेंडशीपपेक्षा जास्त पुढचे दिसले होते. दोघं एकाच सोसायटीमध्ये राहतात आणि नेहमीच एकत्र हँगआउट करताना दिसतात. विक्की हा स्पोर्ट्स रिअॅलिटी एन्टटेन्मेंड शो 'बॉक्स क्रिकेट लीग' च्या मुंबई टीमचा को-ओनर आहे. 

 

6 वर्षे सुशांतसोबत लिव्ह-इनमध्ये राहिली आहे अंकिता...
- अंकिता आणि सुशांतला 2009 मध्ये झीटीव्हीच्या 'पवित्र रिश्ता' मध्ये प्रमुख भूमिका मिळाली होती. 2009 मध्ये सुरु झालेला हा शो 2014 मध्ये ऑफ-एयर झाला.
- 'पवित्र रिश्ता' च्या सेटवर दोघांची जवळीक वाढली. दोघं जवळपास 6 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिले. यानंतर 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.
- मार्च 2016 मध्ये सुशांतने घर सोडले. दोघांच्या ब्रेकअपच्या वेगवेगळ्या थेरीज समोर आल्या होत्या. अंकिता खुप पजेसिव्ह आहे असे बोलले गेले आणि असेही बोलले जाते की, सुशांत तिचा विश्वास जिंकू शकला नाही.
- सुशांतची आपल्या को-स्टारसोबत वाढलेली जवळीक, तर अंकिताचे जास्त अल्कोहोलिक होणे यामागचे कारण मानले गेले. 
- परंतू या विषयी सुशांतने एकदा मौन सोडले. तो बोलला की, "ती अल्कोहोलिक नव्हती, आणि विचित्र स्वभावाची पण नव्हती. दुर्देवाने लोक वेगळे होतात. हे वेळेनुसार होते." यापुर्वी अंकितानेही ट्विट करुन फॅन्स आणि मीडियाला रिक्वेस्ट केली होती की, ब्रेकअपविषयी काहीही गोष्टी करु नका.
- सध्या सुशांत सिंह राजबूत 'राब्ता' चित्रपटाची को-अॅक्ट्रेस कृती सेननला डेट करत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...