आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावत्र भावासोबत पूलमध्ये पोज देताना दिसली पूजा बेदीची मुलगी, व्हायरल झाले Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया हिचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आलिया सध्या इंडोनेशियाच्या बाली येथे हॉलिडे एन्जॉय करत आहे. या हॉलिडेचे काही फोटोज तिने इन्स्टाग्रामवर सेअर केले आहेत. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज बघायला मिळतोय. एका फोटोत आलिया तिचा सावत्र भाऊ जानसोबत बिकिनीत पोज देताना दिसतेय. 


आईवडिलांचा झाला आहे घटस्फोट..
पुजा बेदी आणि फरहान इब्राहिम फर्नीचरवाला यांची मुलगी आलियाचा जन्म 1997 मध्ये झाला. तिच्या जन्माच्या काही वर्षांनी म्हणजे 2003 मध्ये पूजा आणि इब्राहिम यांचा घटस्फोट झाला. पूजा बेदीपासून विभक्त झाल्यानंतर फरहानने अभिनेता फरदीन खानची बहीण लैला खानसोबत 2010मध्ये लग्न थाटले. फरहान आणि लैका यांचा एक मुलगा असून जान हे त्याचे नाव आहे. 2013 मध्ये जानचा जन्म झाला.


ग्रॅज्युएट आहे आलिया..

-आलियाने गेल्यावर्षी न्यूयॉर्कच्या फिल्म अकॅडमीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
- बातम्यांनुसार, आलिया सध्या फॅशन इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करत असून मोठ्या पडद्यावर पदार्पणाची तयारीसुद्धा करत आहे. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये राहते.
- 2011 मध्ये आलिया तिची आई पूजा बेदीसोबत सोनी इंटरनॅशनल चॅनलच्या एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये पूजा आणि आलिया स्पर्धक होत्या.
- आलियाचे इंस्टाग्रामवर तब्बल तीन लाख फॉलोअर्स आहेत. मित्रांसोबत पार्टी करणे तिला पसंत आहे. पार्टी आणि बिकिनीतील तिचे बरेच फोटोज इंस्टाग्रामवर बघायला मिळतात.


रामानंद सागर यांच्या पणतीसोबत झाले होते भांडण...
आलिया आणि रामानंद सागर यांची पणथी साक्षी यांच्या नोव्हेंबर 2014 मध्ये लोअर परेलच्या एका पबमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर पूजा बेदीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे साक्षीची आई मिनाक्षी सागर यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पॉस्को अॅक्टअंतर्गत पोलिसांनी पूजा बेदीला अटक केली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, आलियाचे काही निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...