आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः 'ससुराल सिमर का' या मालिकेतील सिमर अर्थातच अभिनेत्री दीपिका कक्कड अलीकडेच अभिनेता शोएब इब्राहिमसोबत विवाहबद्ध झाली. 22 फेब्रुवारी रोजी मुस्लिम पद्धतीने दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघांनी एक फोटोशूट केले असून यामध्ये शोएब पत्नी दीपिकाला किचनमध्ये स्वयंपाकात मदत करताना दिसतोय. शिवाय तो तिला घर कामातही मदत करतोय. इतकेच नाही तर शोएब दीपिकाची सेवा करतानाही दिसतोय.
दीपिका-शोएबचे झाले डेस्टिनेशन वेडिंग...
- दीपिका-शोएबचे डेस्टिनेशन वेडिंग लखनऊपासून 100 किलो मीटर अंतरावर असलेल्या मौदाहा येथे झाले.
- शोएबचे कुटुंब भोपाळमध्ये वास्तव्याला असून त्याचे वडिलोपार्जित घर उत्तरप्रदेशात आहे. त्यामुळे लग्न याठिकाणी करण्यात आले.
- या डेस्टिनेशन वेडिंगचे पूर्ण प्लानिंग या कपलने मिळून केले होते. 'ससुराल सिमर का' (2011) या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. सुरुवातीला मैत्री झाली आणि 2013 पासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले. शोएबने फॅमिली मेंबर्सच्या उपस्थिती 'नच बलिए'(2017)च्या सेटवर दीपिकाला लग्नाची मागणी घातली होती.
पुढील स्लाईड्सवर बघा, दीपिका आणि शोएब यांच्या नवीन फोटोशूटचे निवडक PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.