आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिता भादुरी यांना मिळाले होते मृत्यूचे संकेत, आजारपणात 15 दिवसांपुर्वीपर्यंत करत होत्या शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री रिता भादुरी यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. रिता मुंबईच्या विले पार्लेच्या सुजय हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्यांची किडनी कमकुवत होती आणि त्या डायलिसिसवर होत्या. 17 जुलैच्या रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालावली.


आजारपणातही कामातून घेतला नाही ब्रेक
रिता यांची कामाची आवड पाहून 'निमकी मुखिया' चे शूटिंग शेड्यूल त्यांच्या वेळेप्रमाणे ठेवले जात होते. रिता या बोलताना म्हणाल्या होत्या की, "म्हातारपणात होणा-या आजारांच्या भितीने काम का सोडायचे, मला कामात व्यस्त राहणे आवडते."


'मिळाला होता मृत्यूचा संकेत' 
'निमकी मुखिया'चे निर्माता आणि लेखक जामा हबीब सांगतात की, त्यांना मृत्यूचा आभास झाला होता. हबीब म्हणाले की, "आम्ही गेल्या आठवड्यात त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यांची तब्येत चांगली नव्हती. त्यांनी जवळपास 15 दिवसांपुर्वी शूटिंग केली होती. आम्ही त्यांच्या बरे होण्याची वाट पाहत होतो. त्यांच्या निधनामुळे आम्ही आजची शूटिंग स्थगित केली आहे."


'निमकी मुखिया'च्या कलाकारांनी काढली आठवण

शिशिर शर्माने रीता यांची आठवण काढत फेसबुकवर लिहिले, "रिता भादुरी आपल्यामध्ये नाहीत. आम्ही एका अद्भुत व्यक्तीला गमावले. त्या आमच्या सर्वांच्या आईप्रमाणे होत्या. आम्ही त्यांना खुप मिस करु"
- 'निमकी मुखिया'ची अभिनेत्री शिवानी चक्रवर्ती म्हणाली "गेल्या दोन महिन्यांपासून त्या ठिक नव्हत्या. माझ्या सह-कलाकार असण्यापेक्षा त्या खुप चांगल्या माणुस होत्या. मी त्यांच्याकडून खुप काही शिकले. त्या माझ्या कुटूंबाप्रमाणे होत्या."
- मालिकेत त्यांच्या सूनेही भूमिका निभावणारी गरिमा सिंह म्हणाली - "आम्ही एकच रुम शेअर करायचो. आम्ही अनेक गोष्टी शेअर करायचो. त्या खुप सकारात्मक महिला होत्या."


चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही केले काम
आपल्या पाच दशकांच्या करिअरमध्ये रिता यांनी जवळपास 70 चित्रपट आणि 30 टीव्ही शोजमध्ये काम केले. यामध्ये 'कभी हां कभी ना',बेटा,फूलन देवी, 'क्या कहना', 'दिल विल प्यार व्यार' आणि 'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं' सारख्या चित्रपटांचा समावेश होता. यासोबतच  'साराभाई वर्सेस साराभाई', 'हम सब भारती', 'छोटी बहू', 'कुमकुम', 'खिचड़ी सारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले. त्यांनी गुजराती चित्रपटांमध्येही काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...