आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडनाव, चेह-यातील साधर्म्यामुळे रीता भादुरींना जया बच्चनची बहीण समजायचे लोक, पण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रीता भादुरी यांचे सोमवारी रात्री वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. त्या दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने पीडित होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना महिन्याभरापूर्वी मुंबईतील सुजॉय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. अंधेरीस्थित पारसीवाडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


रीता यांना जया बच्चन यांची बहीण समजायचे लोक 
रंजक बाबा म्हणजे रीता भादुरी यांना अनेक लोक जया बच्चन यांची बहीण समजत होते. चेह-यातील साधर्म्य आणि सारख्या आडनावाने दोघींमध्ये बहिणीचे नाते होते, असा लोकांचा समज होता. पण असे मुळीच नव्हते. एका मुलाखतीत रीता यांनी सांगितले होते, की मी आणि जया बहिणी नाहीत. आम्ही बहिणी असल्याचे अनेक लोक समजतात. पण आमच्या दोघींत कुठलेही नाते नाही. आता मला याची सवय झाली आहे.

 

रीता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1955 रोजी लखनऊ येथे चंद्रिमा भादुरी यांच्या घरी झाला, तर जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध लेखक-पत्रकार तरुण कुमार भादुरी यांच्या घरी झाला. रीता आणि जया यांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे.

 

आजन्म अविवाहित राहिल्या रीता भादुरी... 
Dainikbhaskar.com ला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रीता यांनी सांगितले होते, की त्यांनी कधीच लग्न केले नाही. काकांसोबत त्या मुंबईत वास्तव्याला होत्या. त्यांना दोन थोरल्या बहिणी आणि एक भाऊ आहे. भाऊ रणदेव भादुरी आणि मोठे मेहुणे वरुण मुखर्जी हे बॉलिवूडमध्ये कॅमेरामन म्हणून कार्यरत आहेत. तर दोघी बहिणी हाऊस वाईफ आहेत.

 

- रीता यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनयात रुची होती. त्यांनी 1971 मध्ये ‘फिल्म अँड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया’, पुणे येथे प्रवेश घेतला होता. दोन वर्षे येथे अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर त्या फिल्म इंडस्ट्रीत दाखल झाल्या. 

 

-  रीता यांनी साईन केलेला पहिला चित्रपट 'आईना' हा होता. पण त्यापूर्वीच त्यांचा 'जूली' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यांनी मल्याळम भाषेतील ‘कन्याकुमारी’ या चित्रपटात काम केले होते. यात कमल हासन आणि मुरली दास हीरो होते.

 

- टीव्हीवर त्यांची पहिली मालिका ‘बनते बिगडते’ ही होती. दुरदर्शनवर ही मालिका प्रसारित व्हायची. त्यानंतर त्या ‘मधुरिमा’, ‘खानदान’, ‘अमानत’, ‘काजल’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘जमीन आसमान’, ‘गृहलक्ष्मी का जिन्न’, ‘हद कर दी’, ‘अमानत’, ‘हम सब बाराती’, ‘एक महल हो सपनों का’सह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. अलीकडच्या काळात त्या ‘निमकी मुखिया’ या मालिकेत इमरती देवी (दादी) च्या भूमिकेत झळकल्या होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...