आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Actress Rubina Dilaik And Abhinav Shukla Wedding Album: Rubina And Abhinav Sangeet Engagement To Saat Phere Inside Photos

Wedding Album: साखरपुडा, संगीतापासून सप्तपदीपर्यंत, असे झाले रुबीना-अभिनवचे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक 21 जून रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. शिमल्यातील प्रसिद्ध वुडविल पॅलेसमध्ये पंजाबी आणि हिमाचल पद्धतीने दोघांचे लग्न झाले. बुधवारी रुबीना आणि अभिनव यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर लगेचच रुबीनाच्या हातावर अभिनवच्या नावाची मेंदी काढण्यात आली आणि उशीरा रात्री संगीत सेरेमनी पार पडली. लग्नात शरद केळकर, कीर्ती गायकवाड, हुसैन कुवजेरवाला, टीना कुवजेरवाला, सुरवीन चावलासह अनेक टीव्ही सेलेब्स सहभागी झाले. दोन ठिकाणी या दोघांचे वेडिंग रिसेप्शन होणार आहे. पहिले रिसेप्शन अभिनवचे होमटाऊन असलेल्या लुधियाना येथे 24 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 28 जून रोजी मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार्टी होईल. रिसेप्शनपुर्वी या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रुबीना आणि अभिनव यांच्या साखरपुड्यापासून ते संगीत, सप्तपदीपर्यंतचा संपूर्ण वेडिंग अल्बम दाखवत आहोत. 


अशी सुरु झाली होती दोघांची लव्ह स्टोरी... 
- रुबीना आणि अभिनवची पहिली भेट एका गणपती पुजादरम्यान झाली होती. दोघांच्या एका कॉमन फ्रेंडच्या गणपती पुजेमध्ये त्यांनी प्रथम एकमेकांना पाहिले होते. 
- यावेळी अभिनवने सांगितले, "मी रुबीनाला पहिल्यांदा साडीत पाहिले होते आणि ती मला फारच सुंदर वाटली. मला पाहताच क्षणी रुबीना आवडली. "
- याबद्दल रुबीनाला विचारले असता तिने सांगितले की, तिच्या एका फोटोवर अभिनवने कमेंट केले आणि विचारले की मी तुमचे फोटोशूट करु शकतो का? त्यावेळी हा मुलगा कोण असा प्रश्न रुबिनाला पडला. 
- यानंतर रुबीनाला वाटले की हा तोच मुलगा आहे ज्याहबद्दल प्रत्येक मुलगी स्वप्न पाहत असते. मग रुबीनाने स्वतःच पुढाकार घेतला. 
- रुबिना म्हटली, "आपण जशी कल्पना करतो अभिनव तसाच आहे. तो एका हिऱ्याप्रमाणे आहे आणि याच हिऱ्याला पकडायचे असे मी ठरवले. "


जेव्हा अभिनवने दिले रुबीनाला सरप्राईज..
- अभिनव आणि रुबीनाने 2015 साली डेटींगला सुरुवात केली. रुबीनाच्या एका वाढदिवशी रुबीनाला अभिनवने सरप्राईज केले. ज्याचा फोटो रुबीनाने सोशल अकाउंटवर शेअर केला. त्यावेळी तिने लिहीले, "जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला असे ट्रीट करेल तेव्हा वाटेल तुम्ही राणी आहात. आय लव यु"
- एका मुलाखतीदरम्यान रुबीनाने सांगितले की, मी त्याला पैंडोरा बॉक्स म्हणते, कारण तो नेहमीच क्रिएटीव असतो आणि नेहमीच सरप्रआईज देतो. 

 

मिस्टर इंडिया स्पर्धत सहभागी झाला होता अभिनव...

- मुळचा लुधियानाचा असलेला अभिनव 2004 मध्ये मिस्टर इंडिया या स्पर्धत सहभागी झाला होता.
- अभिनव फोटोग्राफरसोबतच अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत 'जाने क्या बात हुई', 'छोटी बहू', 'गीत', 'हिटलर दीदी', 'दिया और बाती हम' या मालिकांमध्ये काम केले आहे.
- बॉलिवूडमध्ये तो 'जय हो', 'रोर' आणि 'अक्सर-2' या चित्रपटांमध्ये झळकला.

 

या मालिकांमध्ये झळकली रुबीना...
- रुबीनाने 'छोटी बहू' (2008-10) आणि मालिकेच्या सिक्वेल (2011-12) मध्ये लीड रोल साकारला होता.
- याशिवाय ती 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14) या मालिकांमध्ये झळकली आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, रुबिना आणि अभिनव यांचा Wedding Album...

 

बातम्या आणखी आहेत...