आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding नंतर मुंबईत परतले रुबीना-अभिनव, सासू नव्हे मित्राच्या आईने केला रुबीनाचा गृहप्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक आणि अभिनव शुक्लाचे  28 जून रोजी मुंबईतील जुहूस्थित किशोर कुमार यांच्या बंगल्यावर दुसरे वेडिंग रिसेप्शन आहे. रिसेप्शनपूर्वी नवविवाहित दाम्पत्य रुबीना आणि अभिनव मुंबईत दाखल झाले आहेत. रुबीनाचा लग्नानंतर तिच्या मुंबईतील नवीन घरी गृहप्रवेश झाला आहे. या दाम्पत्याने लग्नापूर्वी मालाड परिसरात नवीन घर खरेदी केले होते. याच घरात रुबीनाने प्रवेश केला. हे दाम्पत्य 21 जून रोजी शिमला येथे लग्नगाठीत अडकले.


मित्राच्या आईने केला रुबीनाचा गृहप्रवेश... 
- मालाड स्थित नवीन घरी रुबीनाचा गृहप्रवेश तिच्या सासूबाईंनी नव्हे तर त्यांचा मित्र गौतम हेगडेच्या आईने केला. 
- वर्क कमिटमेंट्समुळे लग्नानंतर हे दोघे मुंबईत आले. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणी फॅमिली मेंबर्स येऊ शकले नाहीत. अशात त्यांच्या मित्राच्या आईने त्यांचे वेलकम केले.
- रुबीनाने इंस्टाग्रामवर फोटो आणिर कॅप्शन पोस्ट करुन ही माहिती दिली.
- तिने लिहिले - "After all the rituals and Functions, we head To Mumbai (in our new home) ........ as we are committed to our work , we chose to get back... And after a week of unforgettable memories and celebrations...... with friends and Family around, (deep down) i didn’t want to step in my new world without “Being Welcomed and blessed”... and here’s what happened 🤗 my secret desire was fulfilled by ‘sensitively’ thoughtful 😇@hegdeg as Aai (his amazingly graceful maa) did my Greh-Pravesh☺️.... what a heart warming moment it was for us @ashukla09 .......... (one of the Best surprises)”।   

बातम्या आणखी आहेत...