आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV च्या 'किन्नर बहू' ने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपूडा, दोन महिन्यानंतर येथे होईल लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'शक्ती : अस्तित्व के अहसास' या मालिकेत किन्नरची भूमिका साकारणा-या रुबीना दिलाइकने बॉयफ्रेंड अभिनव शुक्लासोबत साखरपुडा केला आहे. 21 जूनला हे दोघ विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघं एकमेकांना गेल्या चार वर्षांपासून डेट करत आहेत. रुबीनाने आपल्या साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती अंगठी दाखवत आहे. तिने कॅप्शनमध्ये 'And i said “YES “ ☺️'. असे लिहिलेय.


या कारणांमुळे हिमाचलमध्ये करणार लग्न
- रुबीना आणि अभिनवचे लग्न हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये होणार आहे.
- शिमला, रुबीनाचे मुळगाव आहे. तिचे जास्तीत जास्त नातेवाइकही येथेच राहतात. यामुळे लग्न इथेच होणार आहे.
- सूत्रांनुसार रुबीना आणि अभिनवचे प्री-वेडिंग फंक्शन आणि सेरेमनी मुंबई आणि लुधियानामध्ये होतील.
- दोघांचे लग्न हिमाचल आणि पंजाबी ट्रेडिशननुसार होणार आहेत.


लग्नाविषयी बोलली असे
रुबीनाने एका एन्टटेन्मेंट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'हो आम्ही आमचे नाते पुढे घेऊन जात आहोत. आम्ही चार वर्षांपासून एकमेकांना डेट करतोय. या काळात आम्ही एकमेकांना समजून घेतले. या आठवणी आयुष्यभर आमच्यासोबत राहतील. तर अभिनवने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी लग्न करतोय परंतू घोड्यावर बसणार नाही. कारण मला माझ्या लग्नाच्या दिवशी एखाद्या प्राण्याला त्रास द्यायचा नाही. रुबिना आणि अभिनवची पहिली भेट गणपती उत्सवाच्या काळात झाली होती. यानंतर दोघांनी 'छोटी बहू' या मालिकेत काम केले. रुबीना टीव्हीच्या हॉट सुनांपैकी एक आहे. ती बोल्ड आणि बिंदास स्टाइलसाठी ओळखली जाते.''


रुबीनाने केलेय या शोमध्ये काम
- रुबीनाने 'छोटी बहू' (2008-10) आणि याचे सीक्वल (2011-12) मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. 
- यासोबतच तिने 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14) सारख्या मालिकांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रुबिना-अभिनवचे फोटोज...
 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...