आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवशी बोहल्यावर चढणार 'किन्नर बहू', 4 वर्षापासून या अॅक्टरला करतेय डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'शक्ती : अस्तित्व के अहसास' की या मालिकेत किन्नरची भूमिका साकारणारी रुबिना दिलाइक बॉयफ्रेंड अभिनव शुक्लासोबत लग्न करणार आहे. गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही यावर्षी 24 जूनला लग्नगाठीत अडकणार आहेत. रुबिनाने एका एन्टटेन्मेंट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "हो आम्ही रिलेशनशीप पुढे नेत आहोत. आम्ही चार वर्षांपासून एकमेकांना डेट करतोय. या काळात आम्ही एकमेकांना समजून घेतले. या आठवणी आयुष्यभर आमच्यासोबत राहतील." तर अनुभवने सांगितले की, "हो आम्ही लग्न करतोय. जूनमध्ये आम्ही लग्न करुन, परंतू अजून डेट फिक्स झालेली नाही. दोघांच्या कुटूंबातील लोकांना या नात्यासाठी परवाणगी दिली आहे."


 

लग्नात घोड्यावर बसण्याविषयी असे बोलला अभिनव...

अभिनव म्हणाला, "मी लग्न करतोय, पण घोडीवर बसणार नाही. कारण मला असे वाटते की, माझ्या लग्नाच्या दिवशी एखाद्या प्राण्याला त्रास होऊ नये. दोघांचे लग्न हिमाचल आणि पंजाबी ट्रेडिशननुसार होईल. रुबिना आणि अभिनवची पहिली भेट गणपती उत्सवामध्ये झाली होती. यानंतर दोघांनी 'छोटी बहू' या मालिकेत एकत्र काम केले. टीव्हीच्या हॉट सूनांमधील रुबीना आपल्या बोल्ड आणि बंदास स्टाइलसाठी ओळखली जाते."

 

रुबीनाने केलेय या शोजमध्ये काम
- रुबीनाने 'छोटी बहू' (2008-10) आणि याचा सीक्वल (2011-12) मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.
- यासोबत तिने 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14) सारख्या मालिकांमध्येही काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रुबिना आणि अभिनवचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)