आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 महिन्यानंतर जेलमधून बाहेर आली TV अभिनेत्याची बायको, मुलीला पाहून झाली इमोशनल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एक मुलगी आपल्या आईला 10 महिन्यांनंतर भेटत होती. हा क्षण खुप भावुक करणारा होता. दहा महिन्यांपासून तिची आई दुबईच्या तुरुंगात होती. आईला पाहताच मुलगी आईकडे धावत गेली. लगेच आईला बिलगली. आईनेही तिला प्रेमाने जवळ घेतले. 'ये है मोहब्बते' मध्ये काम केलेला अभिनेता अमित टंडनची बायको रुबी टंडन आणि 10 वर्षांची मुलगी जियानाची ही स्टोरी आहे. दुबई जेलमधून बाहेर आल्यानंतर दुबई एअरपोर्टवर पहिल्यांदा ती जेव्हा मुलीला भेटली. तो क्षण भावूक करणारा होता.

 

का जेलमध्ये होती रुबी
रुबीला दुबईने जेलमध्ये टाकले होते. रुबी दुबईच्या राफा जेलमध्ये होती. तिने दुबईतील हेल्थ ऑफिसर्सला धमकावले असा तिच्यावर आरोप होता. रुबी दुबईमध्ये एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. अमित टंडन तिला जेल बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत राहिला. या दहा वर्षात त्याने मुलीची खुप काळजी घेतली.

 

मुंबईमध्ये डर्मेटोलॉजिस्ट आहे रुबी
रुबी मुंबईच्या अंधोरीमध्ये एक प्रसिध्द डर्मेटोलॉजिस्ट आहे. टीव्ही आणि बॉलिवूडचे अनेक अॅक्टर तिचे क्लाइंट आहेत. मोनी रॉयचा समावेश यामध्ये आहे. मॉनी रॉय तिला जेलमध्ये दोनदा भेटायला गेली होती. रुबी ही  कनाडाची नागरिक आहे. शिकागो यूनव्हर्सिटीमधून रुबीने मेडिकलची डिग्री घेतली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रुबी टंडन आणि तिची मुलगी जियानाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला

असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...